रोम: विश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षांनी साथ ने देता अनुपस्थिती लावल्याने इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी (Mario Draghi) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर इटलीमध्ये मध्यवर्ती निवडणूक लागण्याची शक्यता आहे. इटलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता दिसत होती. परिणामी आता पंतप्रधानांच्या राजीनाम्याने झाली आहे. 


पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी त्यांचा राजीनामा इटलीचे राष्ट्रपती (President of Italy) यांच्याकडे सुपूर्त केला आहे. गेल्या आठवड्यातच द्राघी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला होता, पण त्यावेळी त्यांनी तो स्वीकारला नव्हता. विश्वासदर्शक ठरावावेळी युतीतील पक्षाने अनुपस्थिती लावल्याने द्राघी यांचं सरकार धोक्यात आलं. 


मारिओ द्राघी यांना विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांच्या मित्र पक्षांनी साथ दिली नाही, त्यांनी सभागृहात आपली उपस्थितीही लावली नाही. त्यामुळे नाईलाजाने मारियो द्राघी यांना नाईलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. 


मारिओ द्राघी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी सेंट्रल-राईट पार्टी असलेल्या फोर्झा इटालिया, लिग आणि फाईव्ह स्टार मुव्हमेंट या पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यामुळेच द्राघी यांचे 17 महिन्यांचे सरकार कोसळलं. 


मारिओ द्राघी यांची 17 महिन्यांची कारकीर्द
मारिओ द्राघी यांच्या सरकारमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला फाईव्ह स्टार मुव्हमेंट (M5S) पक्षाने विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकल्याने द्राघी यांचं सरकार अडचणीत आलं. त्यानंतर द्राघी यांनी राजीनामा दिला आहे. मारिओ द्राघी 2021 पासून इटलीच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. या 17 महिन्यांच्या कारकिर्दीमध्ये मित्रपक्षांनी आपल्याला साथ दिली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानतो असं मारियो द्राघी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: