Hamas-Israel Attack Mastermind : हमासने इस्रायलवर हल्ला (Israel-Hamas Conflict ) केल्यानंतर आता यांच्यातील संघर्ष अधिक पेटला आहे. हमास (Hamas) ने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर (Israel-Gaza Conflict) शेकडो क्षेपणास्त्रांचा मारा (Rocket Attack) करत हल्ला केला. यानंतर इस्रायल (Israel) ने प्रतिहल्ला करत युद्धाचं रणशिंग फुकलं. पॅलेस्टिनी आणि इस्रायल यांच्याकडून तिन्ही मार्गांनी एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. या युद्धात (Israel Hamas War) दोन्ही बाजूंचे शेकडो लोक मारले गेले आहेत. इस्रायलवरील हल्ल्याचा मूळ मास्टरमाईंड कोण हे जाणून घ्या.
इस्रायलवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार
हमासचा प्रमुख नेता मोहम्मद दाईफ याच्या इशाऱ्यावर हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर हल्ला केल्याचं सांगितलं जातं. गेल्या दोन दशकांपासून इस्रायल हमासच्या या प्रमुख नेत्याला ठार मारण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण प्रत्येक वेळी तो मृत्यूला चकवा देऊन निसटतो. हमासचा हात-पाय आणि एक डोळा नसलेला या प्रमुखाच्या सांगण्यावरून हमासची सूत्रे हलतात.
कोण आहे मोहम्मद दाईफ?
मोहम्मद दाईफ हा हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. मोहम्मद दाईफला इस्रायलने 'ओसामा बिन लादेन' म्हटलं आहे. दाईफ इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू आहे. इस्रायल गुप्तचर यंत्रणा मागील 58 वर्षांपासून त्याचा खात्मा करण्याच्या प्रयत्नात आहे. इस्रायलने मोहम्मद दाईफला सात वेळा मारण्याचा प्रयत्न केला. इस्रायलच्या हल्ल्यात दाईफने एक डोळा, हात आणि दोन्ही पाय गमावले. पण, प्रत्येक वेळी तो हल्ल्यातून बचावला. या इस्रायली हल्ल्यांमध्ये त्याने आपली पत्नी आणि दोन मुले देखील गमावली. मोहम्मद दाईफला एक डोळा आणि हात-पाय नसल्याने तो व्हिल चेअरमध्ये असतो असं सांगितलं जातं.
प्रत्येक वेळी मृत्यूला चकवा
द सनच्या रिपोर्टनुसार, मोहम्मद दाईफ नेहमीच गाझामध्ये बनवलेल्या भूमिगत बोगद्यांच्या नेटवर्कमध्ये असतो. या बोगद्यांमुळे मोहम्मद दाईफ प्रत्येक वेळी इस्रायलची गुप्तचर संस्था 'मोसाद'च्या हातातून निसटतो. हे बोगदे बांधण्यात मोहम्मद दाईफचाही मोठा वाटा आहे. मोहम्मद दाईफ एका जागी जास्त काळ थांबत नाही आणि दररोज आपलं ठिकाण बदलत राहतो. इस्रायलकडे मोहम्मद दाईफचा एकच फोटो असून तो जुना आहे. मोहम्मद दाईफचा जन्म एका निर्वासित छावणीत झाला. त्याने स्वत:च नाव बदलून 'दाईफ'. दाईफ हा अरबी भाषेत शब्द असून त्याचा अर्थ 'अतिथी' असा आहे.