Israel Hamas War: इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन समर्थित अतिरेकी संघटना हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. या पाचव्या दिवशी इस्रायलने मोठा निर्णाय घेतला आहे. हमासशी लढण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी विरोधी पक्षांसोबत आपत्कालीन सरकार स्थापन केले आहे. सत्ताधारी लिकुड पक्षाच्या युतीने यावर सहमती दर्शवली होती. इस्रायलमध्ये स्थापन केलेल्या या सरकारमध्ये सर्व पक्षांचा समावेश असेल. यामध्ये एक युद्ध मंत्रिमंडळ तयार केले आहे.


इस्रायलने स्थापन केलेल्या आपत्कालीन सरकारचं प्राथमिक उद्दीष्ट हे गाझामधील हमाससोबत सुरू असलेल्या संघर्षावर लक्ष केंद्रित करणे आहे. या गंभीर काळात कोणतीही असंबंधित धोरणे किंवा कायदे पुढे नेण्यापासून परावृत्त करणे आहे. हमासने इस्रायलवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या सरकारनं विरोधी पक्षांसह सैन्यात सामील होऊन आपत्कालीन सरकार निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. इस्रायलमध्ये 1973 नंतर प्रथमच अशा आपत्कालीन सरकारची घोषणा करण्यात आली आहे.


हमासने आमच्यावर हल्ला करून मोठी चूक केली : पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू 


युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, हमासने आमच्यावर हल्ला करून मोठी चूक केली आहे. हमास आणि इस्रायलच्या इतर शत्रूंच्या अनेक पिढ्या अनेक दशके लक्षात ठेवतील अशी किंमत हमासला भोगावी लागेल. आम्हाला युद्ध नको होते. ते अतिशय क्रूर पद्धतीने आमच्यावर लादण्यात आले आहे. आम्ही युद्ध सुरू केले नाही परंतु आम्ही ते आता संपवू. इस्रायल केवळ आपल्या लोकांसाठीच नाही, प्रत्येक देशासाठी लढत असल्याचे मत PM नेतन्याहू यांनी व्यक्त केले आहे. युद्धाच्या परिस्थितीत, विरोधी पक्षाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आम्ही लष्कर आणि सरकारला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे इस्रायलचे माजी पंतप्रधान यायर लॅपिड यांनी सांगितले.


बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा


इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel-Palestine Conflict) दहशतवादी संघटना हमास  (Hamas) यांच्यात युद्ध सुरु आहे. हमासच्या हल्ल्यात (Israel-Hamas Conflict) इस्रायलच्या 900 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच्या प्रत्युत्तरात इस्रायल लष्कराने गाझापट्टी (Gaza Update) हमासच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 500 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या संघर्षादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला इशारा दिला आहे. हे युद्ध आम्ही सुरू केले नाही पण आम्हीच हे युद्ध संपवू, असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Isreal PM Netanyahu's Son: देशासाठी लढ, नेत्यानाहूंनी मुलाला सैन्यासोबत पाठवलं, व्हायरल फोटोमागचं सत्य काय?