World Cup 2023: पाच ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेट विश्वचषकाला (World Cup 2023) सुरुवात झाली आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या टुर्नामेंटमध्ये भारताने शानदार सुरुवात केली आहे. भारताने (India) पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला (Australia) हरवलं. विश्वचष्काला सुरुवात झाल्यापासून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. क्रिकेट चाहत्यांना विश्वचषकाशी संबंधित नवनवीन माहिती गुगल बाबाकडून मिळत आहे. आता या वर्ल्ड कप फिव्हर दरम्यान, विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला खरी ट्रॉफी दिली जाते का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


विश्वचषक ट्रॉफीबाबत प्रश्न


गेली अनेक वर्षं विश्वचषकावेळी हा मुद्दा प्रत्येक वेळी चर्चेचा विषय ठरला आहे. क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला कोणती ट्रॉफी मिळते? हे जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सुकता आहे. जी ट्रॉफी विविध शहरांमध्ये दाखवली जाते, तीच ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जाते का?


खरी ट्रॉफी कुठे जाते?


वास्तविक, विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला खरी ट्रॉफी (World Cup Trophy) दिली जात नाही, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मूळ ट्रॉफी संपूर्ण स्पर्धेत ठेवली तर जाते, जेव्हा संघ जिंकतो तेव्हा त्याला ही ट्रॉफी तात्पुरती दिली देखील जाते, ज्यासोबत सर्व खेळाडू आणि संघ फोटो काढतात, परंतु शेवटी संघ जी ट्रॉफी घरी किंवा मायदेशी घेऊन जातो ती ट्रॉफी खरी नसून ती एक प्रतिकृती असते. विश्वचषकासारखी दिसणारी ही ट्रॉफी संघ स्वतःसोबत आपल्या देशात घेऊन जातो. यानंतर खरी विश्वचषक ट्रॉफी आयसीसीच्या मुख्यालयात परत पाठवली जाते.


दरवर्षी क्रिकेटच्या या महाकुंभासाठी ट्रॉफी तयार केली जाते, जी हुबेहुब विश्वचषक ट्रॉफीसारखी दिसते. ते बनवण्यासाठी एक खास टीम आहे, जी सुरेख नक्षीकाम करून ट्रॉफीची प्रतिकृती तयार करते. यामध्ये चांदी आणि सोन्याचाही वापर करण्यात येत असून या ट्रॉफीचं वजन सुमारे 11 किलो असतं.


विश्वचषकाच्या रणधुमाळीत आयसीसी क्रमवारी जारी


विश्वचषकाचा रणसंग्राम सुरु असतानाच आयसीसीने वनडे फलंदाजीची क्रमवारी जारी केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, केएल राहुल आणि विराट कोहली यांना मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार खेळी करणाऱ्या राहुल आणि विराट कोहली यांनी क्रमावारीमध्ये मोठी झेप घेतली आहे.  रोहित शर्माला मात्र एका गुणांचा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित शर्मा शून्यावर तंबूत परतला होता. आघाडीच्या 10 फलंदाजामध्ये भारताचे दोन फलंदाज आहे. शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे तर विराट कोहली सातव्या स्थानावर आहे.


हेही वाचा:


Pune PMPML News : क्रिकेट प्रेमींसाठी PMPML कडून खास गिफ्ट; पुण्यातील वर्ल्डकप सामन्यांसाठी जादा बस, तिकीट किती आणि कुठून सुटणार बस?