Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel-Hamas War) यांच्यात युद्ध सुरुच आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहे. या युद्धातील मृतांचा आकडा वाढतानाच दिसत आहे. हमासने इस्त्रायलवर हल्ला केला आणि चर्चा सुरु झाली ती त्यांच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची… मोसादसारख्या जगातील सर्वाच अत्याधुनिक गुप्तचर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. मात्र, यातूनच प्रश्न असा उपस्थित राहतो की ‘हमास’ने युद्धासाठी गनिमी कावा वापरायला सुरुवात केली आहे? कोण आहे ही हमास दहशतवादी संघटना आणि कशी आहे हमासची युद्ध कार्यशैली? पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट… 


हमासनं युद्धाची कार्यशैली बदलली?


आधुनिक शस्त्रास्त्रांची सुसज्ज असे इस्त्रायल सैन्य, टेहाळणीसाठी असलेली अत्याधुनिक यंत्रणा, आयरन डोम सिस्टिम आणि त्याच्या जोडीला असलेली इस्त्रायलची मोसाद ही गुप्तचर यंत्रणा. मात्र, 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर हजारो रॉकेट डागले आणि या हल्ल्यात शेकडो लोकं मारली गेली. हमासने 7 ऑक्टोबर रोजी सकाळी केलेल्या हल्ल्याने संपूर्ण जगात खळबळ माजली. हमासकडून 40 हजार अतिरेकी या हल्ल्यात सहभागी झाले. हमास या संघटनेनं आपल्या युद्धाची कार्यशैली बदलली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


अवघ्या काही मिनिटांत इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रांचा मारा


हमासने अवघ्या काही मिनिटांमध्ये इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागले आहेत. यासोबतच, त्यानंतर अनेक दहशतवादी सीमा रेषेवरील कुंपण तोडत दुचाकी आणि चारचाकीसह इस्त्रायलमध्ये आत शिरले आहेत. इतकंच नाही तर, ग्लायडरच्या माध्यमातून काहींनी देखील सीमा रेषा ओलांडली. त्यामुळे इस्रालयकडून देखील युद्धाची घोषणा केली गेली.


हमासचा हल्ला रोखण्यात इस्रायलला अपयश


इस्त्रायलवर अशा प्रकारचा हल्ला होणार याची कुणकुण इजिप्तच्या गुप्तचर यंत्रणांना आधीच लागली होती, तसे संकेत इस्त्रालयच्या यंत्रणांना देखील देण्यात आले होते. मात्र, तरीही हल्ला रोखण्यात अपयश आल्याने इस्त्रायलवर टीका होत आहे. दरम्यान, इस्त्रायलनं याप्रकरणी चौकशी सुरु केली असल्याची देखील माहिती आहे.


हमास काय आहे? 


हमास ही पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना आहे. इस्त्रायलने पॅलेस्टाइनच्या प्रदेशावर कब्जा केल्याच्या विरोधात पहिल्या इतिफादच्या सुरुवातीला ही संघटना उदयास आली. शेख अहमद यासिन यांनी 1987 साली गाझा पट्टीत हमासची स्थापना केली. 2004 साली इस्त्रायलने यासिनसह अनेक हमासच्या नेत्यांना ठार केलं. अरबी भाषेत 'हमास' म्हणजे इस्लामिक रेजिस्टेंस मुव्हमेंट आहे. गाझा पट्टीवर हमासचे राजकीय नियंत्रण आहे.


अरबी राष्ट्रांकडून हमासला आर्थिक मदत


दरम्यान, अनेक देशांकडून हमासच्या लष्करी युनिटला दहशतवादी संघटना जाहिर केलं आहे. इस्त्रायलच्या कब्जातून पॅलेस्टिनी प्रदेश आणि अल अक्सा मशिदीची मुक्तता ही हमासची उद्दिष्टे असून हिंचासाराच्या जोरावर ते हे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेस्ट बॅंकमध्ये असलेल्या पॅलेस्टिनी वसाहतींनाच भारतासह अनेक देशांची मान्यता आहे. त्यामुळे हमासचे नियंत्रण असलेल्या गाझा पट्टीवर इस्त्रायलसह अनेक देशांनी निर्बंध लावले आहेत. मात्र, अरबी राष्ट्रांकडून हमासला मोठे आर्थिक बळ मिळत असल्याचे पाहायला मिळतं.


जगासाठी धोक्याची घंटा


हमासने इस्त्रायलवर पहिल्या दिवशी केलेला हल्ला मानसिक युद्धतंत्राचा देखील भाग होता. दरम्यान, सध्याची परिस्थिती बघायची तर गाझा पट्टी परिसरातील वीज पुरवठांसह अनेक गोष्टींची कमतरता आहे. येत्या 24 तासांत इस्त्रायलकडून मोठा हल्ला करत गाझा पट्टीवर नियंत्रण घेण्याचा प्रयत्न देखील होताना दिसेल. मात्र, एखाद्या दहशतवादी संघटनेनं बलाढ्य समजल्या जाणाऱ्या सशस्त्र देशाला अशाप्रकारे कोंडीत पकडणं आणि गनिमी काव्याचा वापर करत गुप्तचर यंत्रणांना चकवा देत इतका मोठा हल्ला करणं जगाला धोक्याची घंटा निर्माण करणारा आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Israel-Gaza Conflict : गर्व आहे! इस्रायल-हमास युद्धात भारतीय बनला देवदूत, युद्धाच्या काळात शेकडो सैनिकांचं पोट भरतोय