Elon Musk : गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध (Israel Hamas War) सुरू असून त्यामुळे गाझा पट्टीतील दळणवळण आणि इंटरनेट सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मानवतावादी मदत करणाऱ्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आता या कामी टेस्लाच्या इलॉन मस्क यांनी (Elon Musk) पुढाकार घेत स्टारलिंकच्या (Starlink) माध्यमातून गाझा पट्टीमध्ये मानवतावादी मदतीसाठी इंटरनेट सुविधा प्रदान करणार असल्याचं सांगितलं आहे. 


अलेक्झांड्रिया ओकॅसिओ-कॉट्झ (Alexandria Ocasio-Cortez) यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्या म्हणतात की, जवळपास 22 लाख लोक वास्तव करत असलेली गाझा पट्टी संवादाच्या कोणत्याही माध्यमांपासून वंचित आहे. त्या ठिकाणी बचावकार्य करत असलेलेल वैद्यकीय कर्मचारी, पत्रकार, मानवतावादी कार्यकर्ते आणि इतर सर्वसामान्य लोकांचा जीव धोक्यात आहे. 


 






या ट्विटवर इलॉन मस्क यांनी रिप्लाय दिला आहे. ते म्हणतात की, स्टारलिंक (Starlink) गाझामधील आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मदत संस्थांच्या कनेक्टिव्हिटीसाठी मदत करेल.


 






स्टारलिंक ही मस्कची इंटरनेट सेवा देणारी कंपनी आहे, ज्याच्या विकासात मस्क यांची स्पेस फ्लाइट कंपनी SpaceX चा मोठा वाटा आहे. स्टारलिंक उपग्रहांचे आयुष्य जरी 5 वर्षे असले तरी सध्या स्पेसएक्सचे 42 हजार उपग्रह अंतराळात आहेत, ज्याद्वारे ते कुठेही इंटरनेट सुविधा देऊ शकतात.


पॅलेस्टिनी भूभागावर इस्रायलच्या जोरदार बॉम्बगोळ्यांच्या वर्षावानंतर शुक्रवारी गाझा पट्टीमध्ये इंटरनेट आणि फोन नेटवर्क पूर्णपणे बंद करण्यात आले. पॅलेस्टिनी टेलिकम्युनिकेशनकडून त्याची माहिती देण्यात आली.


इस्त्रायल आणि हमासमधील या युद्धाला 22 दिवस उलटून गेले आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंचे जवळपास 9000 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. त्यानंतरही इस्त्रायलने गाझा पट्टीत तीव्र हल्ले सुरूच ठेवले आहेत.


ही बातमी वाचा: