नवी दिल्ली : वर्ल्ड कप हारा पण पाकिस्तानला मारा अशी म्हण नेहमीच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे वर्णन करण्यासाठी नेहमीच वापरली जाते. यंदाच वर्ल्डकप हा भारतामध्ये होत आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक रोमांचक मुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र, या सामन्यासाठी सर्व तिकीटे आतापर्यंत विकली गेली आहेत. त्यामुळे अनेक चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी खेळी करताना तब्बल 14000 तिकीट उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे तिकिटाच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रिकेटच्या चाहत्याना मिळणार आहेत. बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली आहे. 




जास्त मागणीमुळे तिकीट होल्ड


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. आशिया चषक 2023 मधील क्रिकेट दिग्गजांमधील शेवटचे दोन सामने पावसामुळे वाहून गेले. 14 ऑक्टोबर रोजी होणार्‍या सामन्यामुळे प्रेक्षकांच्या दोन्ही संघांमधील उत्कंठा आणखी वाढू शकते. सध्या, बुक माय शोवर भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची किंमत 2000 रुपये दर्शविली जात आहे, परंतु तुम्ही ते आत्ता बुक करू शकत नाही. तिकिटांची मोठी मागणी लक्षात घेता, वेबसाइटने बुकिंग थांबवले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या