काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबलुमध्ये इराकच्या दूतावासावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यावेळी एका आत्मघातकी दहशतवाद्यानं दूतावासाच्या परिसरात स्वत:ला उडवून दिलं. यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला.


अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यात एका दहशतवाद्यानं स्वत: ला उडवून दिल्यानं 26 जणांचा मृत्यू झाला.

हा हल्ला सुरु झाल्यानंतर चार तासानंतर सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यावेळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेनं स्विकारली आहे.

आयसिसच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या पुन्हा वाढत्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी केल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.