अबू अल बगदादी जिवंत, पाच वर्षांनी डोकं वर, श्रीलंका स्फोटांची जबाबदारीही स्वीकारली
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2019 08:13 AM (IST)
सीरियातील आयसिसच्या तळांना नष्ट केल्याचा सूड उगवण्यासाठी श्रीलंकेतील स्फोट घडवल्याचं बगदादीने व्हिडिओमध्ये केला आहे. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी आधीच स्वीकारली होती.
मुंबई : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी जिवंत आहे. बगदादीने तब्बल पाच वर्षांनंतर व्हिडिओ जारी करत जिवंत असल्याचा पुरावा दिला आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारीही बगदादीने स्वीकारली आहे. अमेरिकेने सीरियातल्या स्फोटात बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता. मात्र बगदादी नावाची डोकेदुखी सहजासहजी संपताना दिसत नाही. जितक्या वेळा बगदादीचा खात्मा झाल्याच्या बातम्या येतात, तितक्याच वेळा तो पुन्हा डोकं वर काढून थयथयाट घालतानाही दिसतो.