बगदाद (इराक) : इराकची राजधानी बगदादमध्ये दोन स्फोटांमध्ये जवळपास 79 नागरिकांचा मृत्यू आणि 130 हून अधिक जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे. एक स्फोट गजबजलेल्या बाजारपेठेत एका कारमध्ये झाला, तर दुसरा स्फोट पूर्व बगदाद मध्ये झाला. या स्फोटांची जबाबदारी आयसिस या इस्लामिक दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

 

2016 मधील सर्वात मोठा स्फोट

 

बगदादमधील गजबजलेल्या बाजारपेठेत आयसिसने रविवारी सकाळी आत्मघातकी स्फोट केला. यामध्ये 79 जणांचा मृत्यू, तर 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. राजधानी बगदादवरील हा या वर्षीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. रमजानच्या निमित्ताने अनेक मुस्लीम नागरिक या बाजारपेठेत खरेदीसाठी येतात.

 

दरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये शुक्रवारी रात्री उच्च सुरक्षा असणाऱ्या परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचीही जबाबदारी आयसिसने घेतली आहे.