ढाका : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 वर्षीय भारतीय तरुणीचाही मृत्यू झाला आहे. तारूषी जैन असं मृत्यूमुखी पडलेल्या तरूणीचं नाव आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करून तारूषीच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

 

13 तासांच्या कारवाईनंतर 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात बांग्लादेशच्या लष्कराला यश आलं आहे. काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास ढाक्यातील होली आर्टीसन रेस्टॉरन्टवर आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.

 

दहशतवाद्यांनी ओलीस धरून ठेवलेल्या 20 जणांची निर्घृण हत्या केली. ज्यांना कुराणची आयत वाचता आला नाही, त्या सर्वांना दहशतवाद्यांनी ठार केलं. कारवाईदरम्यान बांग्लादेशच्या लष्करानं 13 जणांची सुटका केली आहे.

 

संबंधित बातमी :बांगलादेशात हल्ला : 6 दहशतवाद्यांचा खात्मा, 20 नागरिकांचाही मृत्यू