... म्हणून लाईव्ह मुलाखत सोडून अँकरलाच पळ काढवा लागला!
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2017 08:24 AM (IST)
काही दिवसांपूर्वीच इराण-इराक सीमा भाग भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता 7.3 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. या भूकंपावेळी इराकमधील एका न्यूज चॅनेलमध्ये लाईव्ह मुलाखतीमधून अँकरलाच पळ काढावा लागला.
बगदाद/ इराक : काही दिवसांपूर्वीच इराण-इराक सीमा भाग भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता 7.3 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. या भूकंपावेळी इराकमधील एका न्यूज चॅनेलमध्ये लाईव्ह मुलाखतीमधून अँकरलाच पळ काढावा लागला. इराकमधील एका न्यूज चँनेलमध्ये लाईव्ह मुलाखत सुरु होती. ही मुलाखत सोमालियातील एका प्रसिद्ध नेत्याची होती. अरबिलकेमधून ही मुलाखत घेण्यात येत होती. पण अचानक भूकंपाच्या धक्क्याने ही मुलाखत अर्ध्यावरच सोडून न्यूज अँकरला स्टूडिओतून बाहेर पडावे लागले. न्यूज अँकरने मुलाखत अर्ध्यावरच सोडल्याने सोमालियातील नेत्याची घोर निराशा झाली. त्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. दरम्यान, इराण-इराक सीमेवरील या भूकंपामध्ये 328 जणांना आपला जीव गमाववा लागला. तर 2500 पेक्षा जास्त जण जखमी झाले. दुसरीकडे सोमालियातही या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात सहा जणांचा मृत्यू झाला असून, 150 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हलबजापासून 30 किमी नैऋत दिशेकडे असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओ पाहा संबंधित बातम्या इराण-इराकचा सीमाभाग भूकंपाने हादरला, 135 जणांचा मृत्यू