बिजिंग : चीनमध्ये एक आगळा वेगळा आणि अवाढव्य असा ड्रोन बनवण्यात आला आहे. विमानासारख्या दिसणाऱ्या या ड्रोनचा वापर लष्करासह इतर नागरी आणि सागरी वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात येणार आहे.


या ड्रोनचे पंखे 18 मीटर लांबीचे असून, त्याचं वजन 1.5 टन इतकं आहे. हा अवाढव्य ड्रोन 370 किलोग्रॅंम वजन अगदी सहज वाहून नेऊ शकतो. तसेच सलग 40 तास काम करण्याची या ड्रोनची क्षमता आहे.

विशेष म्हणजे, या ड्रोनच्या साहाय्यानं 50 किलोमीटर दूर अंतरावरची दृश्यं अगदी सहज पाहता येऊ शकतात. तसेच हा ड्रोन 3000 मीटर उंचीवर असतानाही त्याला रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेट वाचता येऊ शकतात, असा दावा करण्यात येत आहे.

या अवाढव्य ड्रोनचं नाव TYW-1 असं असून, हा चायनिज कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्युट आणि स्थानिक कंपन्यांनी मिळून तयार केला आहे.