Iran Hijab Protest : इराणमध्ये (Iran) गेल्या काही महिन्यांपासून देशव्यापी हिजाबविरोधी चळवळ (Iran Anti-Hijab Protests) सुरु आहे. या हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा देणं एका फुटबॉलपटूला (Footballer) महगात पडलं आहे. हिजाबविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे इराणचा फूटबॉलपटू (Iranian Footballer) अमीर नस्र-अजादानी (Amir Nasr-Azadani) याला मृत्यूदंडाची शिक्षा (Death Sentence) सुनावण्यात आली आहे. अमीर नस्र-अजादानी 26 वर्षांचा असून एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार, अमीर नस्र-अजादानी याला नोव्हेंबस महिन्यात हिजाबविरोधी आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमीरवर इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स कमांडरच्या मृत्यूचा आरोपही लावण्यात आला होता.


मीडिया रिपोर्टनुसार, अमीर नस्र-अजादानी एका हिजाबविरोधी आंदोलनात काही वेळासाठी सहभागी झाला होता. यावेळी त्याने इतर आंदोलकांसोबत मिळून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यानंतर अमीर नस्र-अजादानीला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यावर 'मोहरे बेह' म्हणजे देवाविरुद्ध शत्रुत्वाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 'मोहरे बेह' गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात येते.






फिफ्प्रोने केला निषेध 


फिफ्प्रो (FIFPRO) या व्यावसायिक फुटबॉल खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने अमीर नसर-अजदानीला दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आवाज उठवला आहे. व्यावसायिक फुटबॉल खेळाडू अमीर नसर-अजादानी याला इराणमध्ये आपल्या देशात महिलांच्या हक्कांसाठी आणि मूलभूत स्वातंत्र्यांसाठी मोहीम चालवल्याबद्दल फाशीची शिक्षा भोगावी लागत असल्याच्या बातमीने फिफ्प्रोला खूप धक्का बसला आहे. संघटनेने ट्विट करत म्हटले आहे की, 'आम्ही आमिरच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत आणि त्याची शिक्षा त्वरित रद्द करण्याची मागणी करतो.'


महसा अमिनीच्या मृत्यूनंतर सुरु झाली हिजाबविरोधी चळवळ


सप्टेंबर महिन्यात 22 वर्षीय महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने इराणमध्ये हिजाब विरोधी मोहिम इराणमध्ये निदर्शने सुरू झाली. महसा अमिनीला राजधानी तेहरानच्या भेटीदरम्यान हिजाब व्यवस्थित न घातल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.  त्यानंतर पोलीस कोठडीत असताना तिला दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर, हिजाबविरोधी निदर्शने इराणमध्ये वणव्यासारखी पसरली आणि चळवळ अधिक तीव्र झाली. इराणमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिजाबविरोधी संघर्ष सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांना इराण सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आहे.