Israel Iran war: इराणसोबतच्या वाढत्या संघर्षाचा फटका अखेर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. इराणाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे  इस्रायलचेपंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना त्यांच्या मुलाचं लग्न पुढं ढकलावं लागलं आहे.  'द टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, नेतान्याहू यांचा मुलगा अवनेर नेतान्याहू  त्याची  जोडीदार अमित यार्देनीसोबत सोमवारी लग्न करणार होता . मात्र गाझामध्ये इस्रायली ओलीस ठेवलेले असतानाही काही सरकार विरोधी निदर्शकांनी नेतान्याहू कुटुंबाचा उत्सव साजरा केल्याबद्दल वाद निर्माण झाल्यानंतर नेतान्याहूंनी लग्न पुढे ढकलले . .

Continues below advertisement


याशिवाय नेतान्याहू कुटुंब मेगा सेलिब्रेशनची तयारी करत असताना, शुक्रवारी इस्रायल इराणवर मोठा हल्ला केला . ज्यामध्ये अनुस्थळे लष्करी सुविधा क्षेपणास्त्र तळे आणि इस्लामिक रिपब्लिक मधील वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्यात आले होते .याचे प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला .ज्यामुळे देशभरात आणीबाणी सुरू झाली आहे .दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्रांचे सायरन वाजत आहेत .यामुळे तेथील बहुतांश लोकसंख्या बॉम्ब अश्रयस्थानांमध्ये ढकलली जात आहे .


नेतान्याहू यांच्या मुलाच्या लग्नावरून वाद


गेल्या अनेक महिन्यांपासून इजराइल मध्ये अवनर नेतन्याहू याचं लग्न मोठ्या चर्चेचा आणि वादाचा विषय बनला होता .अवनर गेल्यावर्षी त्याच्या मैत्रिणीशी लग्न करणार होता .त्याचं लग्न नोव्हेंबरमध्ये जवळजवळ निश्चित झालं होतं . मात्र त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांच्या घराजवळ एक ड्रोन पोहोचला .ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अवनरचं लग्न पुढे ढकलण्यात आले .


इराण दुहेरी संकटात


इराणने रविवारी पुन्हा एकदा इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढलाय. तर दुसरीकडे इस्रायली हल्ल्यांमध्येही प्रचंड प्रमाणात नासधूस, विध्वंस झाला असून मोठी जीवित हानी झालीय. अशातच आता इराणची राजधानी असलेलं तेहरान शहर देखील सध्या दुहेरी संकटात सापडलं असल्याचे चित्र आहे. कारण इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे आणि त्यानंतर उद्भवलेल्या सीवेज संकटामुळे तेहरान शहरातील नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करवा लागत आहे.   सध्या रस्त्यांवर सांडपाणी वाहत असून नागरिकांना दुर्गंधी, रोगराई आणि दैनंदिन जीवनातील अडथळ्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


इस्त्रायल-इराणचे हल्ले प्रतिहल्ले


इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्त्रायलनं इराणच्या  संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची राजधानी तेरहानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्त्यालनं केला आहे. इराणमध्ये एका रहिवासी हल्ले झाले आहेत. त्यामध्ये  29 मुलांसह 60 जणांचा मृत्यू झाला.


हेही वाचा


Iran Vs Israel War: इराण-इस्रायल युध्दाचा भारताला काय फटका बसणार? समजून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे