नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकाराधिकार वापरल्यानं इस्त्रायलला इराणचे सर्वोच्च नेते  अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येची योजना रद्द करावी लागली. वृत्तसंस्था रॉयटर्सनं याबाबत  माहिती दिली आहे. एका वरिष्ठ अमेरिकेच्या अधिकाऱ्यानं म्हटलं  की इराणनं आतापर्यंत एखाद्या अमेरिकन व्यक्तीला मारलं आहे का? याचं इतर तर जर नाही असेल तर  इराणच्या राजनैतिक नेतृत्त्वाला  लक्ष्य करण्याची चर्चा करणार नाही. 

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या संदर्भात  टिप्पणी करण्यास नकार दिला. ते म्हणाले याबाबत काही बोलणार नाही. मात्र, FOX न्यूजला दिलेल्या  एका मुलाखतीत म्हटलं की सध्या सुरु झालेल्या संघर्षानंतर इराणमध्ये सत्ता परिवर्तन शक्य आहे. आम्ही इराणवर करत असलेल्या हल्ल्यांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना कळवल्याचं म्हटलं होतं. 

डोनाल्ड ट्रम्प यांची दुहेरी खेळी

डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे इराणला इशारा दिला आहे. तर, दुसरीकडे राजनैतिक चर्चेचा दरवाजा खुला ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्र्थ सोशलवर म्हटलं की आमच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर  अमेरिकेच्या सैन्याची पूर्ण ताकत आणि शक्ती इराणवर बरसेल. जे पहिलं कधी पाहिलं गेलं नव्हतं ते घडेल. इराण आणि इस्त्रायल यांच्यात शांतता करार शक्य आहे. आपण सजपणे एका करारापर्यंत पोहोचू शकतो, या रक्तरंजीत संघर्षाला संपवू शकतो, असं ट्रम्प म्हणाले. 

डोन्लाड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि इराणला शांततेसाठी करार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की दोन्ही कट्टर विरोधक देश सामंजस्य करार करतील. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवल्याचा दावा केला. त्यानुसार इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल, काही बैठका आणि फोन कॉल होत आहेत, असं ट्रम्प म्हणाले. 

तुर्कीचा मध्यस्थीचा प्रस्ताव

इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षात मध्यस्थी करण्यासाठी तुर्कीच्या रेचेप एर्दोगन यांनी पाऊल उचललं आहे. रेचेप तैय्यप एर्दोगन यांनी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा केली आणि तुर्की इराण आणि इस्त्याल यांच्यातील अणवस्त्र वाद सोडवण्यास तयार असल्याचं म्हटलं. 

इस्त्रायल-इराणचे हल्ले प्रतिहल्ले

इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्त्रायलनं इराणच्या  संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची राजधानी तेरहानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्त्यालनं केला आहे. इराणमध्ये एका रहिवासी हल्ले झाले आहेत. त्यामध्ये  29 मुलांसह 60 जणांचा मृत्यू झाला.