PM Modi Germany and UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 बैठकीत सहभागी होण्यासाठी रविवारी जर्मनीला पोहोचले आहे. येथे भारतीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. दोन महिन्यात मोदींचा हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी ते 2 मे रोजी जर्मनीला गेले होते. पंतप्रधान संध्याकाळी म्युनिकमध्ये परदेशी भारतीयांच्या कार्यक्रमाला पोहोचले.
काँग्रेसच्या कार्यकाळात लादण्यात आल्या आणीबाणीचा संदर्भ देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, ''जी लोकशाही आपला अभिमान आहे, जी लोकशाही प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये आहे. 47 वर्षांपूर्वी याच दिवशी लोकशाहीला ओलीस ठेवण्याचा, आणीबाणी लादून लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न झाला.'' तत्पूर्वी ते म्हणाले की, मी तुम्हा सर्वांमध्ये भारताची संस्कृती, एकता आणि बंधुभावाची भावना पाहत आहे. तुमचे हे प्रेम मी कधीच विसरणार नाही. तुमचं हे प्रेम आणि उत्साह बघून भारतात जे हा कार्यक्रम पाहत आहे त्यांची छाती नक्कीच अभिमानाने भरून आली असेल.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आणीबाणीचा काळ हा भारताच्या लोकशाही इतिहासातील एक काळ्या डागसारखा आहे, परंतु या काळ्या डागाला वगळून शतकानुशतके चालत आलेल्या लोकशाही परंपरांच्या श्रेष्ठत्वाचाही पूर्ण ताकदीने विजय झाला.
भारत ही लोकशाहीची जननी आहे
नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातील जनतेने लोकशाही चिरडण्याच्या सर्व कारस्थानांना लोकशाही मार्गाने उत्तर दिले. आपण जिथे राहतो तिथे आपण भारतीयांना आपल्या लोकशाहीचा अभिमान वाटतो. प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणतो, भारत ही लोकशाहीची जननी आहे.
भारतातील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, आज भारतातील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे. आज भारतातील जवळपास प्रत्येक गाव रस्त्याने जोडलेले आहे. आज भारतातील 99 टक्क्यांहून अधिक लोकांकडे स्वच्छ स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन आहे. आज भारतातील प्रत्येक कुटुंब बँकिंग प्रणालीशी जोडलेले आहे. ते म्हणाले की, आज भारतातील प्रत्येक गरीबाला 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा आहे.