Iran Commander's Threat to Donald Trump: इराणने 1,650 किमी पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र विकसित केले आहे. इराणचे टॉप कमांडर अमीराली हाजीजादेह (AMIRALI HAJIZADEH) यांनी ही घोषणा केली. यादरम्यान त्यांनी दावा केला आहे की, अमेरिकेचे (america) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मारण्यासाठी आम्ही हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. लवकरच ते त्यांच्या कमांडरच्या हत्येचा (qasem soleimani ) बदला घेणार, असे इराणने (Iran) धमकीच्या स्वरात म्हटले आहे. इराणच्या टॉप कमांडरच्या धमकीनंतर अमेरिकेसह (america) पाश्चात्य देशांची चिंता वाढली आहे. याचदरम्यान रशिया-युक्रेन युद्धात (russia ukraine war) रशिया इराणच्या ड्रोनच्या मदतीने कीवमध्ये सतत बॉम्बहल्ले करत आहे. या युद्धात अमेरिका (america) उघडपणे युक्रेनच्या पाठीशी उभे आहे.


Iran Commander's Threat to Donald Trump: 'इराणच्या कमांडरच्या हत्येचा बदला घेतला जाईल'


इराणच्या (Iran) रिव्होल्युशनरी गार्ड्स एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमिराली हाजीजादेह (AMIRALI HAJIZADEH) यांनी तेथील माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या 1,650 किमी पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या (Iran) क्षेपणास्त्र (Islamic Republic and the culture of the Islamic Revolution) शस्त्रागारात जोडण्यात आले आहे. यासोबतच इराणच्या (Iran) कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जाईल, अशी धमकीही त्यांनी (AMIRALI HAJIZADEH) दिली.


Iran Commander's Threat to Donald Trump: 'निष्पाप सैनिकांना मारण्याचा इराणचा हेतू नव्हता'


हाजीजादेह (AMIRALI HAJIZADEH) म्हणाले की, तेव्हाही निष्पाप सैनिकांना मारण्याचा इराणचा हेतू नव्हता. परंतु जेव्हा त्यांनी (अमेरिकेने) 2020 मध्ये बगदादमध्ये इराणचे (Iran) लष्करी कमांडर कासिम सुलेमानी (qasem soleimani ) यांना ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) ठार केले. तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन (america) सैन्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागून हल्ले करावे लागले.


Iran: युद्धात इराण करत आहे रशियाची मदत 


दरम्यान, युक्रेनमधील (russia ukraine war) युद्धापूर्वी इराणने (Iran) मॉस्कोला ड्रोनचा पुरवठा केला होता. रशियाने (russia ukraine war) पॉवर स्टेशन आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर केला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेंटागॉनने (pentagon america) म्हटले होते की, इराणने हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहेत.


इतर महत्वाची बातमी : 


Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : मुश्रीफ साहेब अमित शाह नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील भेटतील; समरजित घाटगेंचा खोचक टोला