Kim Jong Un Bulletproof Train : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) त्याचे विचित्र नियम आणि कायद्यांमुळे चर्चेत असतो. हुकुमशाह किम जोंग उन नेहमीच वेगवेगळे फर्मान काढून जनतेवर विचित्र नियम लागू करत असल्याचं ऐकायला मिळतं. उत्तर कोरियाने कायम स्वत:ला इतर देशांपासून काहीसं आलिप्त ठेवलं आहे. त्यामुळे तेथील हुकुमशाही राजवटीबाबत अनेकांना कुतूहल वाटतं. किम जोंग उनबाबतही अधिक जाणून घेण्यामध्ये अनेकांना रस वाटतो. किम जोंग उनचं नाव आलं की, विशेष चर्चा होते ती म्हणजे त्याच्या बुलेटप्रुफ ट्रेनची. 


हुकुमशाह किम जोंग उनचा राजेशाही थाट


अलिकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अलिकडेच त्यांच्या युक्रेन दौऱ्यावर ट्रेनने प्रवास केला होता. त्यानंतर लोक या ट्रेनची तुलना किम जोंग उनच्या ट्रेनशी करू लागले. त्यामुळे, सध्या किम जोंग उनची बुलेट ट्रेन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून किम जोंग उनच्या ट्रेनबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मीडिया रिपोर्टनुसार, ही बुलेटप्रुफ ट्रेन अतिशय आलिशान असून जणू शाही महालाप्रमाणे आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. जगातील सर्वात महागड्या दारूपासून ते उत्तमोत्तम खाद्यपदार्थ आणि इतर सुविधा या ट्रेनमध्ये आहेत.


बुलेटप्रुफ ट्रेनमध्ये शाही बेडरुम आणि बरंच काही


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकताच युक्रेनच्या दौऱ्यावेळी ट्रेनने प्रवास केला. यानंतर लोक या ट्रेनची तुलना किम जोंग उनच्या बुलेटप्रुफ ट्रेनशी करताना दिसत आहेत. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन फार कमी वेळा प्रवास करतो. पण तो अनेकदा त्याच्या रॉयल बुलेट प्रुफ ट्रेनने प्रवास करतो.


रॉयल ट्रेनमध्ये 'या' सुविधा


2019 मध्ये किम जोंग रॉयल ट्रेनने व्हिएतनामला पोहोचला होता. याआधी त्याने याच ट्रेनने चीनचा दौराही केला आहे. किम जोंग उनची ही ट्रेन पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे. इतर सामान्य ट्रेनच्या तुलनेने ही ट्रेन वजनाने खूप जड आहे. यामध्ये एखाद्या राजवाड्याप्रमाणे सोयी-सुविधा आहेत. या ट्रेनमध्ये रॉयल बेडरूमची व्यवस्था आहे. यामध्ये अन्न, दारू आणि औषधे यांचा साठा असतो. मात्र, बुलेटप्रुफ असल्याने ट्रेन वजनाने खूप जड असल्याने ती वेगाने धावू शकत नाही. त्यामुळे या ट्रेनचा वेग कमी आहे.


'ही' आहे ट्रेनची खासियत


या ट्रेनची एक खास गोष्ट म्हणजे ही ट्रेन इतर गाड्यांप्रमाणे सामान्य स्थानकांवर थांबत नाही. हुकुमशाह किम जोंगच्या सुरक्षेत कोणताही धोका नसावा म्हणून या रॉयल ट्रेनसाठी स्वतंत्र स्थानकं आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, या ट्रेनमध्ये 22 कोच आहेत. ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये प्रशस्त बाथरूम आणि जेवणाची व्यवस्था आहे. ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये सेवेसाठी महिला कर्मचारीही असतात. या ट्रेनमधून प्रवास करणारे लोक सहसा किम जोंज किंवा किमच्या कुटुंबातील सदस्य असतात. या ट्रेनमध्ये नेहमी एक लष्करी पथकं तैनात असतं. या ट्रेनचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. पण उत्तर कोरिया आणि किम जोंगप्रमाणे ही ट्रेन लोकांसाठी रहस्यमय आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


North Korea : 'मुलांची नाव बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवा'; हुकुमशाह किम जोंग उनचं नवं फर्मान