Instagram Network Down: सोशल मीडियाचे (Social Media) जगभरात लाखो युजर्स आहेत. बऱ्याचदा या सोशल मीडियाच्या माध्यमांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची सेवा काही वेळासाठी ठप्प देखील केली जाते. इन्स्टाग्रामची (Instagram) सेवा काही काळ ठप्प (Network Down) झाली होती. परंतु या मागचे कारण अद्याप कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले नाही. सध्या या गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी मात्र ट्विटरवर मीम्सचा (Memes) धुमाकूळ घातला आहे. Downdetector ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 56 टक्के इन्स्टाग्राम युजर्सना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. तर 23 टक्के युजर्सना लॉग इन करण्यात काही तांत्रिक समस्या येत होत्या. आतापर्यंत 21 टक्के युजर्सनी इन्स्टाग्रामकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यामुळे या तक्रारींची दखल कंपनीकडून घेतली जाते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.
महिन्याभरात दुसऱ्यांदा सेवा ठप्प
महिन्याभरात इन्स्टाग्रामची दुसऱ्यांदा सेवा ठप्प झाल्याचं आता म्हटलं जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी मात्र इन्स्टाग्रामकडे तक्रारींची सुरुवात केली आहे. याआधी 21 मे रोजी इस्टाग्रामची सेवा ठप्प होती. काही तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प झाल्याचं त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. तसेच इन्स्टाग्रामच्या ठप्प सेवेमुळे जगभरातील जवळपास 1,80,000 युजर्सना फटका बसला होता. यामुळे अमेरिकेत जवळपास 1 लाख नागरिक, तर कॅनडामधील 24,000 हजार युजर्सना या अडचणीमुळे त्रास झाला होता. तसेच युनाईटेड किंगडममध्ये 56,000 युजर्सना या तांत्रिक अडचणीची समस्या निर्माण झाली होती.
दरम्यान इन्स्टाग्रामची सेवा आता सुरळीत असली तरी सेवा ठप्प होण्यामागे नेमंक कोणतं कारण आहे हे मात्र अजून कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. तसेच ही सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी नेटकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. इन्स्टाग्रामच्या या समस्येमुळे अनेकांंनी इन्स्टाग्रामला ट्रोल करण्यास देखील सुरुवात केली. युजर्सच्या या तक्रारींना आता इन्स्टाग्राम किती गांभीर्याने घेणार हे पाहवं लागणार आहे.