Petrol Price Hike Pak: पाकिस्तानमध्ये आज रात्रीपासून पेट्रोलच्या दरात मोठा बदल होणार आहे. आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये पेट्रोल 30 रुपयांनी महाग होणार आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने त्याचा परिणाम प्रत्येक वस्तूच्या किमतीवर होणार आहे. एका वृत्तानुसार, बुधवारी IMF सोबतची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर आज मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर प्रति लिटर 30 रुपयांनी वाढणार आहे.
पेट्रोल वाढीची माहिती देताना पाकिस्तान डेलीचे पत्रकार हमजा अझहर सलाम यांनी ट्वीट केलं की, ''IMF सोबतची चर्चा अयशस्वी झाल्याने आज मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर प्रति लिटर 30 रुपयांनी वाढणार.'' अशातच पेट्रोलच्या किमतीत झालेली वाढ ही सरकारची मोठी चूक असल्याचे अर्थतज्ज्ञ म्हणत आहेत. दरवाढीवरून संपूर्ण देशावर हा पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वस्तूंवरील सबसिडी बंद करण्याचा आग्रह धरल्यानंतर पाकिस्तानच्या अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी गुरुवारी पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ करण्याची घोषणा केली. 27 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 30 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. जिओ टीव्हीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आता पाकिस्तानमध्ये डिझेल पेट्रोलचे दर हे असतील.
पाकिस्तानमधील नवीन किमती (प्रति लीटर)
पेट्रोल - 179.86 रुपये
डिझेल - 174.15 रुपये
रॉकेल - 155.56 रुपये
लाइट डिझेल - 148.31 रुपये
इतर महत्वाच्या बातम्या:
Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढणार? सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे संकेत
जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणतात, लवकरच जगात आर्थिक मंदीची लाट, संकट वाढण्याची भीती
Fine On Twitter: यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड