काबूल : अफगाणिस्तानमध्ये एका भारतीय महिलेचं अपहरण झालं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मिस डिसूजा असं या महिलेचं नाव असून तिचं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अपहरण करण्यात आलं आहे.
भारत सरकार मिस डिसूजा यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. डिसूजा या मूळच्या कोलकातामधील आहेत. दुसरीकडे भारतीय दूतावासातील अधिकारीही अफगाणिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
मिस डिसूजा यांची लवकरात लवकर सुरक्षित सुटका व्हावी यासाठी अफगाणिस्तान सरकार प्रयत्न करत आहे. काही वृत्तानुसार, मिस डिसूजा एका एनजीओमhhध्ये काम करतात.