इस्लामाबाद : नजरचुकीने एलओसी पार गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण आमच्याच ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. भारताचे डीजीएमओ रणबीर सिहं आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील चर्चेत हा खुलासा झाला आहे.

भारत आता अधिकृतरित्या चंदू चव्हाण यांना भारताकडे सोपवण्याची मागणी करणार आहे.

सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्याच दिवशी उरी सेक्टरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण नजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानात गेले होते.

भारतासाठी ही बाब दिलासादायक आहे. कारण पाकिस्तानी लष्कराच्या माहितीनंतर चंदू चव्हाण यांना पुन्हा भारतात आणण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची शक्यता वाढली आहे.

पाकिस्तानचा खोटारडेपणा

सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताच्या राष्ट्रीय रायफल दलाच्या एका जवानाला ताब्यात घेतल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. मात्र भारताने चंदू चव्हाण यांना भारताकडे सोपवण्याची मागणी केल्यानंतर चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने सुरु केला. परंतु आता डीजीएमओ यांच्यासोबतच्या चर्चेत चंदू चव्हाण ताब्यात असल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे.

कोण आहेत चंदू चव्हाण?

चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 22 वर्षीय चंदू यांनी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील मिलिट्रीमध्ये आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या

जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!


पाकचा खोटारडेपणा, आता म्हणतात चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच!


22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं


पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा


धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू


होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी


सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?


चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात