ट्रम्प यांनी यापूर्वीच भारताच्या आर्थिक सुधारणा अजेंड्याचं समर्थन केलं होतं. शिवाय भारतीय व्यक्तींविषयी आदरही व्यक्त केला होता.
पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच फोनवरुनही चर्चा झाली. भाजपने मोदींच्या नेतृत्वात मिळवलेल्या उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या यशाबद्दल ट्रम्प यांनी मोदींचं अभिनंदन केलं होतं.
या दौऱ्याची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. मात्र या वर्षाच्या अखेर हा मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.
आतापर्यंत तीन वेळा फोनवर बातचीत
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदींशी आतापर्यंत तीन वेळा चर्चा झाली. नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा, 24 जानेवारी रोजी जागतिक दहशतवादासंबंधी आणि तिसऱ्यांदा पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील यशाबाबत अभिनंदन करण्यासाठी ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा झाली.
दरम्यान यापूर्वी जुलैमध्ये जर्मनीत होणाऱ्या जी-20 परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास अमेरिका दौऱ्यापूर्वीच मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होऊ शकते.