वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दाम्पत्याच्या मुलीच्या माजी प्रियकरानेच त्यांचा जीव घेतला. दुहेरी हत्याकांड घडवणाऱ्या हल्लेखोरानेही आत्महत्या केली.


सिलिकॉन व्हॅलीतील एका बड्या कंपनीत कार्यकारी पदावर कार्यरत असलेले नरेन प्रभू आणि त्यांच्या पत्नीची राहत्या घरी हत्या करण्यात आली. मिर्झा टॅटलिक या 24 वर्षीय तरुणाने प्रभू दाम्पत्याची हत्या केली.

प्रभू यांची कन्या अमेरिकेतील दुसऱ्या भागात राहते. संशयित हल्लेखोराचे तिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र वर्षभरापूर्वी ते वेगळे झाले होते.

प्रभू यांच्या 20 वर्षीय मुलाने कॅलिफोर्नियातील सॅन होजे पोलिसांना या हल्ल्याविषयी माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी घराच्या दरवाजातच एक जण मृतावस्थेत आढळला. मोठ्या मुलाच्या माहितीनुसार त्यांची आई आणि 13 वर्षांचा धाकटा भाऊ संशयितासोबत आत होते.

पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने धाकट्या मुलाला सोडून दिलं. मात्र त्यावेळी प्रभू पती-पत्नी आणि संशयित हल्लेखोर मृतावस्थेत आढळले.