Indian Navy : भारताच्या 8 माजी नौसैनिकांना कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, भारत सरकारकडून (Indian Government) सुरु असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आलय. भारताने आवाहन केल्यानंतर या माजी नौसैनिकांची शिक्षा रद्द करण्यात आलीये. याप्रकरणी आम्ही न्यायालयात गेलो होतो. यानंतर सुनावनीदरम्यान ही शिक्षा कमी करण्यात आली आहे, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारताकडून या माजी नौसैनिकांची शिक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. 


परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?


परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत बोलताना म्हटले की, सध्या आम्ही न्यायालयाने सुनावलेल्या विस्तृत निर्णयाची वाट पाहात आहोत. आमची कायदेविषयक काम करणारी टीम पुढील रणनिती निश्चित करत आहे. आम्ही सध्या आठही माजी नौसैनिकांच्या संपर्कात आहोत. आज सुनावणी झाली तेव्हा राजदूत आणि अधिकारीही उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयाने (Foreign Ministry) पुढे बोलताना सांगितले की, आम्ही आठही माजी सैनिकांच्या कुटुंबियांसोबत सुरुवातीपासून आहोत. या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता आम्ही याबाबत जास्त चर्चा करु इच्छित नाहीत. आम्ही या प्रकरणी सातत्याने कतार सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. 


माजी नौसैनिक कोणत्या कंपनीत काम करत होते?


मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी नौसैनिक दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अँड कन्सलटन्सी सर्विसेसमध्ये काम करत होते. या कंपनीकडे सैन्य दलांना उपयुक्त असणारी यंत्रे पुरवली जातात. शिवाय ही कंपनी सुरक्षा एजन्सींची स्थानिक भागिदार देखील आहे. त्यामुळे सैन्य दलात उपयुक्त असणाऱ्या उपकरणांची या कंपनीकडून देखभाल केली जाते. निवृत्त 8 नौसैनिक गेल्या 4 ते 6 वर्षांपासून कंपनीत काम करत होते. मृत्यू दंडाची शिक्षा रद्द झालेल्या नौसैनिकांपैकी कमांडर पूर्णेंदू तिवारी हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. 2019 त्यांना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कतारमधील कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पूर्णेंदू तिवारी भारतीय नौदलात अनेक मोठ्या नौकांचे काम पाहात होते. मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतरही कतार सरकारने माजी नौसैनिकांवरिल आरोप गुप्त ठेवले होते. सार्वजनिकरित्या त्यांच्यावर असलेले आरोप सांगण्यात आले नव्हते. मात्र, त्यांना सुरक्षेच्या कारणास्तवच अटक करण्यात आली होती. यानंतर मृत्यूदंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Hafiz Sayeed : दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा; भारताची पाकिस्तानकडे मागणी 


Ayodhya Ram Mandir : राम मंद‍िर पर‍िसर आधुनिक सुविधांनी सज्ज, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुविधा