Most Expensive Potato : आपल्या सर्वांच्या घरी नेहमी करण्यात येणारी भाजी म्हणजे बटाट्याची (Potato) भाजी. बाजारात आपण वेगवेगळ्या प्रकारची बटाटे पाहतो. पण आज आपण जगातील सर्वात महाग बटाट्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. हे बटाटे प्रति किलो 90 हजार रुपये किंमतीनं विकलं जातं. म्हणजे सोने आणि चांदीपेक्षाही महाग दरानं ह बटाटे विकले जाते. या बटाट्याबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? जाणून घेऊयात या आगळ्या वेगळ्या बटाट्याबद्दलची सविस्तर माहिती. 


'ले बोनोटे' असं या बटाट्याच्या जातीचं नाव


प्रति किलो 90 हजार रुपये किंमतीनं विकल्या जाणाऱ्या बटाट्याच्या या जातीचे नाव 'ले बोनोटे' (Le Bonnotte) असं आहे. हे बटाट्याचे उत्पादन फ्रान्समध्ये घेतलं जातं. एक किलो बटाट्याची किंमत इतकी जास्त आहे की एका मध्यमवर्गीय कुटुंबाला वर्षभराचा रेशन एवढ्या पैशात मिळू शकतो. हे बटाटे 50,000 ते 90,000 रुपये प्रति किलो या दराने विकले जाते. इतके महाग असूनही ले बोनोटे खरेदी करण्यासाठी लोक रांगा लावतात. लिंबाबरोबरच त्यात मीठ आणि अक्रोडाची चवही असते. जी इतर कोणत्याही बटाट्यात मिळत नाही. ते खूप मऊ आणि नाजूक बटाटे आहे.


साधारणपणे आपल्याकडे वर्षभर बटाटा खाल्ला जातो. कारण त्याची किंमत कमी असते. सध्या किरकोळ बाजारात बटाट्याची किंमत ही 20 ते 25 रुपये प्रतिकिलो आहे. वर्षभर जास्तीत जास्त 30 ते 50 रुपये या दराने बटाटे विकले जातात. परंतू, फ्रान्समध्ये विकलं जाणारं 'ले बोनोटे' या जातीचं बटाटे 90000 रुपये किलो दरानं विकलं जातं. 


मे ते जून या कालावधीतच उत्पादन


बटाट्याच्या या जातीचे नाव Le Bonnotte आहे. जे फ्रान्समध्ये घेतले जाते. दरम्यान, या बटाट्याचे उत्पादन कमी आहे. वर्षभरातील मे ते जून या कालावधीतच या बटाट्याचे उत्पादन केले जाते. त्याची किंमत गगनाला भिडली तरी लोक ती विकत घेऊन खायला तयार असतात.


फक्त 100 टन बटाटे असतील


या विलक्षण जातीच्या बटाट्याची चव वेगळी आहे. या खास प्रकारच्या बटाट्याची लागवड ही केवळ 50 चौरस मीटर वालुकामय जमिनीवर केली जाते. ते वाढवण्यासाठी, सीव्हीड खत म्हणून वापरले जाते. अटलांटिक महासागरातील लोअर प्रदेशाच्या किनार्‍यावरील नोइमॉर्टियर या फ्रेंच बेटावर पारंपारिकपणे याची लागवड केली जाते. लागवडीनंतर, सुमारे 2500 लोक बटाटे उचलण्यासाठी सात दिवस गुंतलेले असतात. 10,000 टन बटाट्याच्या पिकांपैकी फक्त 100 टन 'ला बोनेट' बटाट्याचे उत्पन्न होते. 


हे बटाटे खूप मऊ 


ला बोनेटच्या चवीबद्दल बोलायचे झाले तर त्यात मीठ आणि अक्रोडांसह लिंबाची चव आहे. जी इतर कोणत्याही बटाट्यामध्ये आढळत नाही. ते खूप मऊ आणि नाजूक आहे. असे म्हणतात की ते सहसा उकळवून तयार केले जाते. हे बटाटे आकाराने लहान आहेत. गोल्फ बॉलच्या आकारापेक्षा मोठे नाहीत. त्यांचा लगदा मलईदार पांढरा असतो. उपलब्धतेनुसार त्यांची किंमत दरवर्षी बदलते, परंतु आतापर्यंत ते 50,000 ते 90,000 रुपये प्रति किलो या दराने विकले गेले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Potato Farming : भारतातील देशी बटाट्याला परदेशात मोठी मागणी, 'या' सहा राज्यात 90 टक्के उत्पादन