इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कर कोणत्याही आक्रमणाला उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचा इशारा पाकिस्तानने भारताला दिला आहे. “पाकिस्तानने कधी सर्जिकल स्ट्राईक केला, तर भारत पिढ्यान पिढ्या विसरणार नाही.”, अशी धमकी पाकचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी दिली.

 

जनरल राहील शरीफ लवकर निवृत्त होणार आहेत. त्याआधी राहील शरीफ म्हणाले, “जर पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक केला, तर भारत पिढ्यान पिढ्या विसरणार नाही. शिवाय, भारत शाळेतील मुलांनाही पुस्तकातून शिकवेल की, सर्जिकल स्ट्राईक काय असतं.”

भारताने सर्जिक स्ट्राईक केल्याचं राहील शरीफ यांनी फेटाळलं असून, भारताला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर सक्षम असल्याचंही ते म्हणाले.

शाहिद आफ्रिदीच्या नावाच्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन प्रसंगी राहील शरीफ बोलत होते. लष्करप्रमुख पदाच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीनंतर 29 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत.

“भारतीय सैन्याकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाही पाकिस्तान संयम कायम ठेवला. मात्र, सर्वसामान्य लोकांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत”, असेही राहील म्हणाले.