India-Russia Relation : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी SCO आणि G20 चे भारताचे (India) अध्यक्षपद आशिया आणि संपूर्ण जगामध्ये स्थिरता आणि सुरक्षा मजबूत होईल, असं म्हटलंय. रशिया राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने एका निवेदनात ही माहिती दिली. दरम्यान, 1 डिसेंबर रोजी भारताने औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले. यासोबतच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे अध्यक्षपदही भारताकडे आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या नवीन वर्षाच्या संदेशांमध्ये पुतिन म्हणाले की, रशिया-भारत 2022 मध्ये त्यांच्या राजनैतिक संबंधांचा 75 वा वर्धापन दिन साजरा करतील. मैत्री आणि सकारात्मक परंपरांवर दोन्ही देश त्यांची भागीदारी मजबूत करत आहेत.


 


पुतिन यांचा भारतावर विश्वास व्यक्त


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन वर्षाच्या संदेशात पुतिन म्हणाले की, रशिया-भारत 2022 मध्ये त्यांच्या राजनैतिक संबंधांचा 75 वा वर्धापन दिन साजरा करतील. तसेच दोन्ही देशांनी ऊर्जा, लष्करी तंत्रज्ञान आणि सहकार्याच्या इतर क्षेत्रांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि आर्थिक प्रकल्प राबवले. यासोबतच प्रादेशिक आणि जागतिक अजेंडातील महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वित प्रयत्न करण्यात आले. ते म्हणाले की, मला विश्वास आहे की भारताचे SCO आणि G20 अध्यक्षपद आशिया आणि संपूर्ण जगामध्ये स्थैर्य, सुरक्षा मजबूत करेल. तसेच भारत आणि रशिया यांच्यासाठी नवीन संधी उघडतील. दरम्यान, युक्रेनवरील रशियन हल्ल्यावर भारताने अद्याप टीका केलेली नाही. मात्र, युक्रेनचे संकट चर्चेने सोडवले जावे, असा भारताने अनेकवेळा पुनरुच्चार केला आहे.


 


SCO काय आहे?


SCO मध्ये चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. ही युरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा संस्था आहे. भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या दृष्टीने ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संस्था आहे, ज्याने युरेशियाचा अंदाजे 60 टक्के प्रदेश, जगाच्या लोकसंख्येच्या 40 टक्के आणि जागतिक GDP च्या 30 टक्क्यांहून अधिक भाग व्यापला आहे.


G20 काय आहे?


त्याचबरोबर भारतासह एकूण 19 देशांचा G20 मध्ये समावेश करण्यात आला आहे. G20 सदस्य जागतिक जीडीपीच्या अंदाजे 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास दोन तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतात.


 


इतर बातम्या


Covid-19 : पुन्हा कोरोनाचं टेन्शन; चीनमध्ये कोरोनाचा कहर, WHOने मागवली चीनची कोविड आकडेवारी