पणजी: गोव्यात होणाऱ्या ब्रिक्स संमेलनात भाग घेण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आज भारतात दाखल होणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात यावेळी द्विपक्षीय चर्चा होणार असून दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

एस-400 मिसाईल डिफेन्स सिसस्टिम आणि 200 कामोव हेलिकॉप्टर भारत रशियाकडून खरेदी करु शकते. एस-400 हे तब्बल 39 हजार कोटी रुपयांचं तंत्रज्ञान असल्याचं कळतं आहे. याद्वारे शत्रूची शेकडो किलोमीटर अंतरावरची मिसाईल्स पाडता येऊ शकतात. तसेच शत्रूच्या जहाजांनाही लक्ष्य करता येऊ शकतं.