US On India Vs Pakistan War : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan War) यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दहशतवादाविरोधातील कारवाईबाबत भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळत आहे. रशिया आणि जपान यांनी उघडपणे भारताच्या बाजूने समर्थन जाहीर केले आहे, तर चीन आणि तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. अमेरिका देखील भारताच्या समर्थनात असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अमेरिकेच्या भूमिकेत 24 तासांत मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. काल "भारत-पाकिस्तानमधील तणाव आमचा विषय नाही," असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वॅन्स म्हणाले होते. पण आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, पाकिस्तानला चर्चेसाठी मदत करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या (India Pakistan Tension) पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो (Marco Rubio) यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांना फोन केला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला (Asim Munir) देखील फोन केल्याची माहिती समोर आली आहे. 

अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रुस यांच्या म्हणण्यानुसार, "परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याशी संवाद साधला. मंत्री रुबियो यांनी या गोष्टीवर जोर दिला की दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्यासाठी आणि गैरसमज टाळण्यासाठी थेट संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याचे मार्ग शोधणे आवश्यक आहे. तर भविष्यातील वाद टाळण्यासाठी उत्पादक चर्चा सुरू करण्यासाठी अमेरिकेच्या वतीने सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी चर्चा केली. सचिव रुबियो यांनी पुन्हा एकदा यावर भर दिला की, दोन्ही देशांनी सध्याची तणावपूर्ण परिस्थिती कमी करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत आणि चुकीच्या निर्णय किंवा गणनेची शक्यता टाळण्यासाठी थेट संवाद पुन्हा प्रस्थापित केला पाहिजे. भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी रचनात्मक वाटाघाटी सुरू करण्यास अमेरिकेची मदत उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले आहे. याशिवाय त्यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिफ मुनीरला फोन करून परिस्थिती सामान्य करण्याचे आवाहन केले आहे.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचीही एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दरम्यान, पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तसेच पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्याशी फोनवर चर्चा केली. न्यूज एजन्सी IANS ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, फैसल बिन फरहान यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी आणि सुरू असलेल्या सैन्य संघर्षाचा शांततामय मार्गाने शेवट करण्याच्या उद्देशाने राजनैतिक प्रयत्नांवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

India Pakistan War: मोठी बातमी : भारताने गिअर बदलला, आता मिशन DEAD सुरु, पाकिस्तान म्हणतं, आता आम्हाला शांती हवी!

India Vs Pakistan War Opration Sindhoor मोठी बातमी : भारताच्या हल्ल्याची दाहकता हळूहळू दिसली, मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह 5 बड्या दहशवाद्यांचा खात्मा, सर्वांची नावं समोर!