Operation Sindoor: पाकिस्तानने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सीमेवरील तणाव वाढू लागलेला असताना ऑपरेशन सिंदूरअंतर्गत कारवाईत पाकिस्तानचा प्रत्येक हवाई हल्ला भारताने चिरडून टाकला. जम्मू काश्मीरसह पंजाबमधील लष्करी आस्थापनांवर केलेल्या प्रत्येक हल्ल्याला भारताने परतवून लावलं. (Indian Army) पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवर शस्त्रसंधीचा भंग करून तोफांचा मारा सुरू केला होता. या हल्ल्यालाही चोख उत्तर भारतीय सैन्य दलाने दिले आहे. दरम्यान भारताच्या लष्करी सामर्थ्याची अभिमानास्पद कामगिरी, लष्कराच्या कारवाईचा अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ भारतीय लष्कराने शेअर केला आहे. (IND VS PAK)

कदम कदम बढाये जा....

भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तणाव वाढत असतानाच जम्मू सह पंजाब राजस्थान या राज्यांमध्ये ही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. रात्रीच्या अंधारात पाकिस्तानी ड्रोन हवेतच नष्ट करत भारतीय सैन्य दलाने आपल्या शस्त्रसिद्धतेचं दर्शन घडवलं . डोंगररांगांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात  दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हवाई हल्ले सुरू असताना किती तणाव असेल याची कल्पनाही भीतीदायक . एकीकडे हवाई हल्ले दुसरीकडे सैन्यदलाच्या  चोख आणि अचूक कारवाईचे दर्शन . शत्रुराष्ट्र असलं तरी तिथल्या नागरिकांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी घेतलेली काळजी अशा कितीतरी बाबतीत भारतीय लष्कराच्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधा आणि क्षमतांना मोठा धक्का बसला . 

 दरम्यान भारतीय लष्कराने आठ आणि नऊ मे 2025 च्या रात्री जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब मधील अनेक शहरांमध्ये पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांना कसे प्रत्युत्तर दिले याचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे .

भारतीय लष्कराचे पाकिस्तानला चोख उत्तर

भारताच्या लष्करी तळांवर शुक्रवारी (9मे) रात्री सुपरसॉनिक क्षेपणास्त्रं डागणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांनी एअर स्ट्राईक (Air Strike) करुन पाकिस्तानी लष्कराचे चार हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. यापैकी रहिम यार या हवाई तळावर भारताच्या फायटर विमानांकडून क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा करण्यात आला. यामध्ये रहीम यार हवाई तळाचे मोठे नुकसान झाले आहे. येथील विमानांसाठीची धावपट्टी क्षेपणास्त्रांमुळे पूर्णपणे बेचिराख झाली आहे. त्यामुळे आता या हवाई तळावरुन पाकिस्तानी लढाऊ विमानांना उड्डाण करता येणार नाही.भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने शनिवारी सकाळी पाकिस्तानमध्ये घुसली होती.  या विमानांनी क्षेपणास्त्रांनी तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत. पाकिस्तानने 8 व 9 मे रोजी केलेल्या हवाई हल्ल्याला परतवून लावल्यानंतर भारतीय लष्कराने पुन्हा एकदा पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिले आहे.

हेही वाचा:

India Pakistan War Nuclear Attack: पाकिस्तानात अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक खरोखरच झाली का? संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं स्पष्टीकरण