India Pakistan War: पाकिस्तानने पंजाबमधील हवाई तळांवर आज ( 10 मे) पहाटे हवाई हल्ले करत भारताच्या हवाई तळांवरील रुग्णालयांना लक्ष केल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिल्यानंतर भारताच्या सुरक्षा दलांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याचही समोर आलं .जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला ते भुजपर्यंत 26 ठिकाणी क्षेपणास्त्रे सोडल्यानंतर भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले आहेत .दरम्यान फक्त एअर डिफेन्स सिस्टीम असून चालत नाही तर ते ऑपरेट करणारे प्रशिक्षित सैन्य असावे लागते ते आपल्याकडे आहे पाकिस्तानकडे नाही .हा फरक आपल्याला मागच्या दोन दिवसात दिसत असल्याचं एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी एबीपी माझाला सांगितले . (Suryakant Chaphekar)

गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या वेळी काश्मीर पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा जोरदार हल्ला चढवला .मात्र पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे हवेतच उध्वस्त करत भारताने s4oo प्रणाली ,बराक 8 आणि आकाश या क्षेपणास्त्र प्रणालींचा उपयोग करून हा मारा यशस्वीरित्या परतवल्याचे सूत्रांनी सांगितले .पाकिस्तानला भारताचे क्षेपणास्त्र रोखता का आले नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना भारताचे एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमचं अपयश उघड केलंय .

'पाकिस्तान भारताला उत्तर देण्याच्या स्थितीत दिसत नाही '

भारताचे एअर  व्हाईस मार्शल सुर्यकांत चाफेकर यांनी सांगितले, ''फक्त एयर डिफेन्स सिस्टम असून चालत नाही तर ते ऑपरेट करणारे प्रशिक्षित सैन्य असावे लागते ते आपल्याकडे आहे. पाकिस्तान कडे नाही, हा फरक आपल्याला मागच्या दोन दिवसात दिसत आहे.एयर डिफेन्स सिस्टम ऑपरेट करणे आपले सैन्य हे निष्णात व वेल ट्रेन आहे. हेच आपल्या यशांचे गमक आहे.भारताच्या एयर डिफेन्स सिस्टम हे पाकिस्तानी मिसाईल लाँच झाल्यापासून ओळखू शकते , पाकिस्तान लढाखू विमानाची मूव्हमेंट लगेच ट्रॅक करून ते पाडू शकते त्यामुळे पाकिस्तानला ड्रोनचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तान बेभान होवू कृती करत आहे. या परिस्थिती पाकिस्तान भारताला उत्तर देवू शकेल या स्थितीत पाकिस्तान दिसत नाही. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असावे यासाठी पाकिस्थाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची बैठक बोलावली आहे. सध्या पाकिस्तान कधी पांढरा झेंडा दाखवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.''

हेही वाचा:

India Pakistan War: लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट; अनेक लष्करी तळ बेचिराख, पाकड्यांची तिसऱ्या दिवशीही खुमखुमी, सैन्यानं भाजून काढलं