नवी दिल्ली : भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी वायुसेनेचे विमान परतवून लावताना भारतीय वायु सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमन पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. अभिनंदन यांना सोडवण्यासाठी भारताने अतिशय कडक भूमिका घेतली होती. अभिनंदनला सोडवण्यासाठी राजकीय स्तरावर मोठ्या घाडमोडी घडत असताना भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकमेकांवर मिसाईल हल्ले करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले होते.


पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 26 फेब्रुवारी रोजी थेट पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अड्डे उध्वस्त केले. त्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने त्यांची 'एफ 16' विमाने भारतात धाडली होती. परंतु त्यांचा हल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन वर्थमन पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तानी हद्दीत अभिनंदन यांचे मिग 21 विमान क्रॅश झाले. यावेळी अभिनंदन पॅराशुटच्या सहाय्याने पाकिस्तानी हद्दी उतरले. तिथे त्यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले.

व्हिडीओ पाहा



पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन यांना सोडवण्यासाठी भारताने कडक भूमिका घेतली होती. दोन्ही देश एकमेकांवर मिसाईल हल्ले करण्यासाठी पूर्ण सज्ज झाले होते. याबाबतचे बातमी इंग्रजी वृत्तपत्र हिंदूस्तान टाईम्सने प्रसारित केली आहे. या वृत्तानुसार भारतीय उच्चाधिकारी अनिल धस्माना यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना खडवासलेही होते. धस्माना यांनी आमच्या पायलटला परत पाठवा अन्यथा मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारादेखील दिला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. परिणामी दोन्ही देशांनी 9 ते 10 मिसाईल डागण्याची तयारी केली होती.

भारताच्या इशाऱ्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्थमन यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 28 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या संसदेत अभिनंदन वर्थमन यांना दोन्ही देशात शांतता राहावी म्हणून सोडत असल्याचं जाहीर करण्यात आले. 1 मार्च रोजी अभिनंदन यांना वाघा बॉर्डरमार्गे भारतात पाठवण्यात आले.