नवी दिल्ली : भारताने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. भारताच्या 10 मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर 1 हजार किलोचे बॉम्ब फेकले आहेत.

पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरधाकटा भाऊ मौलाना तल्हा सैफ ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.  मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे. या हल्ल्यात अनेक हिटलिस्टवर असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात 350 दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई सेनेला यश आले आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. विशेष म्हणजे हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली केला गेला. पंतप्रधान मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर सफोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला जाईल असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे पाकिस्तान आणि तिथे लपलेले दहशतवादी सावध होते. परंतु भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करुन पाकला व दहशतवाद्यांना जोरदार दणका दिला आहे.

VIDEO



आज भारताने निंयत्रण रेषा ओलांडली. भारतीय हवाई दलाने जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानमधील बालाकोट भागात एअर स्ट्राईक केला. 1 हजार किलोंचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात जैशची कंट्रोल रुम जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान पाकिस्तानी सेनेने भारताव उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं  माघारी परतली असल्याचा दावा पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते  जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवरुन केला आहे.

व्हिडीओ पाहा : जैशच्या तळांवर भारतीय विमानांचा हल्ला | एबीपी माझा



Payload of hastily escaping Indian aircrafts fell in open. pic.twitter.com/8drYtNGMsm