World News: जपानी हायस्कूलच्या (Japanese High School) सामाजिक अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकात (Textbook of Social Studies) भारतीय मूळाचे आणि जपानमध्ये (Japan) स्थायिक झालेले योगेंद्र पुराणिक (Yogendra Puranik) यांचा समावेश करण्यात आला आहे. भारताचे (India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल (IISJ) सोबत त्यांचे नाव, छायाचित्र आणि संक्षिप्त प्रोफाइल पाठ्यपुस्तकात दिसेल.


यासंदर्भात योगेंद्र पुराणिक यांनी बोलताना सांगितलं की, "ही अनपेक्षित ओळख, समुदायाच्या अतुलनीय समर्थन आणि आदराचा परिणाम आहे, जेव्हा मला अधिकार्‍यांनी कळवले तेव्हा मला खरोखरच आश्चर्य वाटलं. हे पाठ्यपुस्तक, एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखलं जाणार आहे. एप्रिल 2024 पासून सर्व जपानी उच्च माध्यमिक शाळांमधील अभ्यासक्रमाचा भाग असेल."




योगेंद्र पुराणिक यांचा जन्म मुंबई जवळील अंबरनाथ येथे झाला. अंबरनाथमध्येच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढील शिक्षण त्यांनी पुणे (Pune), जपान (Japan), फ्रांस (France), चीन (China) मध्ये घेतलं आहे. योगेंद्र पुराणिक हे 2001 सालापासून जपानमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनी सुरुवातीला इन्फोसिस आणि पोलारीस सॉफ्टवेअर (5 वर्ष प्रमुख म्हणून) मध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी जपानी बँकेमध्ये उच्च पदांवर काम केलं आहे. 


त्याचबरोबर त्यांनी भरपूर समाजकार्य करुन, 2019 साली निवडणुकीत उडी मारून, ती जिंकली. असं करून ते जपानमधील पहिले-वहिले आशियाई मुळाचे आमदार झाले आहेत. आता ते जपानमधील शिक्षण विभागात पहिले-वहिले भारतीय मूळाचे सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते जपानमधील एका सरकारी शाळेचे पहिले-वहिले परकीय मुळाचे प्राध्यापकही आहेत.