Bangladesh flood : मान्सून वादळामुळे बांगलादेशमध्ये किमान 25 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि विनाशकारी पुरामुळे किमान 40 लाख लोक अडकले आहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
बांगलादेशातील लाखो लोकांसाठी पूर हा नेहमीचा धोका आहे, परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की हवामान बदलामुळे त्यांची वारंवारता, वेग आणि अनिश्चितता वाढत आहे. गेल्या आठवडाभरात मुसळधार पावसामुळे देशाच्या ईशान्येकडील मोठ्या भागात पूर आला आहे आणि घरे रिकामी करण्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले आहे. शाळांना मदत आश्रयस्थान बनवण्यात आले आहे, त्यामुळे काही तासांमध्ये नद्यांनी संपूर्ण गावे बुडाली आहेत.
पुराच्या पाण्याने अनेक वीज केंद्रांना वेढल्याने अधिकाऱ्यांना सुविधा बंद करण्यास भाग पाडले. नंतर इंटरनेट आणि मोबाइल सेवेवर परिणाम झाला. बांगलादेशातील सिल्हेतमधील तिसरे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ शुक्रवारी पुरामुळे बंद झाले.
पुरातून वाचवण्यात आलेल्या अस्मा अख्तरने सांगितले की, तिचे कुटुंबीय दोन दिवस जेवू शकलेले नाहीत. ती म्हणाली की, "पाणी इतकं वेगाने वाढले की आम्ही आमचे काही सामान आणू शकलो नाही, सर्व काही पाण्याखाली असताना तुम्ही कसे शिजवू खाणार ?
शुक्रवारपासून देशभरात वीज कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. चितगाव शहरात भूस्खलनात चार जण ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. "परिस्थिती वाईट आहे. 40 लाखांहून अधिक लोक पुराच्या पाण्यात अडकून पडल्याची माहिती सिल्हेत प्रदेशाचे मुख्य सरकारी प्रशासक मुशर्रफ हुसेन म्हणाले, जवळजवळ संपूर्ण प्रदेशात बत्ती गुल झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या