इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि राजकीय नेते इम्रान खान यांनी आता तिसरं लग्न करण्याचे संकेत दिले आहेत. आपण लग्नात किमान तिसऱ्यांदा तरी यशस्वी होऊ, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं.
लंडनमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावली असता इम्रान खान यांना प्रश्न विचारण्यात आला. लग्नाच्या बाबतीत माझं रेकॉर्ड चांगलं नाही मात्र तिसऱ्यांदा तरी यशस्वी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान इम्रान खान यांनी यापूर्वीही तिसऱ्यांदा लग्न करण्याचा मार्ग मोकळा असल्याचं सांगितलं होतं.
इम्रान खान यांनी 1995 मध्ये जेमिमा गोल्डस्मिथ, 2015 मध्ये रेहान खान यांच्याशी विवाह केला होता. रेहान खानसोबत लग्नानंतर काही महिन्यातच इम्रान खान यांनी घटस्फोट घेतला.