पॅरिस : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला पॅरिसमध्ये मारहाण करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी मल्लिकाला तिच्या घराबाहेर मारहाण करत मौल्यवान ऐवज लुटला आहे.
मल्लिकाला मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावला असल्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. मल्लिका घराबाहेर पडली असता अश्रुधुराचा वापर करत मल्लिका आणि तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीला मारहाण केली आहे. तसंच मल्लिकाकडे असलेला मौल्यवान ऐवज लुटून नेला आहे. मल्लिकानं लगेच पोलिसांना संपर्क साधत मारहाणीची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असला तरीही हल्लेखोरांचा चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.
अमेरिकन टीव्ही अभिनेत्री कीम करदाशियावर आठवड्यापूर्वीच अशा प्रकारचा हल्ला झाला होता. कीमवर झालेल्या हल्लात तिच्याकडचे पैसे आणि दागिने चोरट्यांनी लंपास केले.