मुंबई : अनेकदा वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमध्ये व्याकरणाच्या चुका होतात. अशाच एका चुकीमुळे पाकिस्तानातील सरकारी वृत्तवाहिनी 'पीटीव्ही'च्या व्यवस्थापकीय संचालकांना नोकरी गमवावी लागली. पाक पंतप्रधान इम्रान खान यांची दृश्यं दाखवताना 'बीजिंग'ऐवजी 'बेगिंग' लिहिण्याची चूक त्यांना महागात पडली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या चीन दौऱ्यावर असून राजधानी बीजिंगमध्ये आहेत. इम्रान खान यांचा सहभाग असलेल्या एका कार्यक्रमाचं प्रक्षेपण करताना 'पीटीव्ही'ने चीनची राजधानी बीजिंगचं स्पेलिंग चुकवलं आणि 'बेगिंग' असं केलं. बेगिंगचा अर्थ भीक मागणे होत असल्याने खरोखर अर्थाचा अनर्थ झाला.
पीटीव्हीच्या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात लोकेशनमध्ये बेगिंग असा शब्द दिसत असतानाच इम्रान खान भाषण देत होते. महत्त्वाचा शब्द लिहिताना कर्मचाऱ्यांनी केलेली हलगर्जी व्यवस्थापकीय संचालकांना भोवली. 'पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ' (पीटीआय) सरकारने चॅनलचे एमडी अर्शद खान यांची तात्काळ उचलबांगडी केली.
या भाषणाचा बेगिंग असा उल्लेख असणारा स्क्रीनशॉर्ट आणि काही सेकंदांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
पाक पंतप्रधानांच्या नावाशेजारी 'बेगिंग', PTV च्या संचालकांची उचलबांगडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2018 12:04 AM (IST)
इम्रान खान यांचा सहभाग असलेल्या एका कार्यक्रमाचं प्रक्षेपण करताना 'पीटीव्ही'ने चीनची राजधानी बीजिंगचं स्पेलिंग चुकवलं आणि 'बेगिंग' असं केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -