नवी दिल्ली: फेसबुकवरील 81 हजार अकाउंट हॅक करुन त्यातील डेटा चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार युझर्सची पर्सनल डिटेल्स 10 सेंट (6.50 रुपए) विकली जात असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे.


डेटा कोणी चोरला याची माहिती जरी मिळाली नसली तरी युझर्सचा डेटा विकण्यासाठी ज्या वेबसाईटवर जाहिरात देण्यात आली होती त्याचा डोमेन पीटर्सबर्ग येथील आहे. यूक्रेन, रशिया, ब्रिटन, अमेरिका आणि ब्राझील या देशासह अन्य देशातील फेसबुक युझर्सची माहिती हॅकर्स विकत आहे.

दरम्यान सप्टेंबर महिन्यात FBsellar या नावाच्या युझरने त्याच्याकडे 12 कोटी युझर्सच्या अकाउंटची माहिती असून, तो ते विकणार असल्याची माहिती त्याने बीबीसीला दिली होती. त्यानंतर सायबर सिक्युरिटी फर्म डिजीटल शॅडोने याचा तपास केल्यास, तो खरच 81 हजार लोकांची माहिती मॅसेजसहित विकत असल्याच समोर आलं. शिवाय हॅकरकडे 1 लाख 76 हजार युझर्सचे ई-मेल एड्रेस आणि फोन नंबर ही आहेत.

फेसबुकचे व्हाइस प्रेसीडेंट गाय रोजेन यांनी यासंबधी स्पष्टीकरण देताना म्हणाले कि, "आम्ही या संदर्भात ब्राउझर मेकर्सशी चर्चा करत आहोत, त्यांना सांगण्यात आलं आहे की ज्या एक्सटेंशनने युझर्सचा डेटा चोरण्यात आला आहे, तो त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात यावा. त्यासोबतच ज्या वेबसाईटवर डेटा विकण्याची जाहिरात देण्यात आली होती ती वेबसाईट ब्लॉक करण्याच प्रयत्न सुरू आहे.