चंद्राच्या काही भागात पाणी असल्याच्या दाव्याला ‘नासा’ने पुष्टी दिली आहे. इस्रोने चंद्रावर पाठवलेल्या ‘चंद्रयान-1’ या यानाने चंद्गाच्या ध्रुवीय प्रदेशात बर्फाच्या रुपात पाणी गोठलेले असल्याची माहिती दिली होती. या माहितीला आता नासानेही दुजोरा दिला आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात बर्फ असल्याचे संकेत मिळाल्याने पुढच्या चंद्र मोहिमांमध्ये, तसेच भविष्यात चंद्रावर राहण्यासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
‘पीएनएस’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ आढळलंय. मात्र ते एकाच ठिकाणी नसून, सर्वत्र विखुरलं आहे. दक्षिण ध्रुवावरील ल्युनर क्रेटर्सजवळ बर्फ गोळा झालंय. चंद्रावर बर्फ असल्याचे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी मिनरेलॉजी मॅपरच्या (M3) आकड्यांचा आधार घेतला आहे.
नासाच माहिती :