Google BARD AI: गुगल (Google)  सतत आपल्या युजर्सना आनंदित करण्यासाठी सतत नवे फीचर्स आणत असतं. त्यातच आता गुगलने त्यांच्या युजर्सना AI (Artificial Intelligence) चा सुखद अनुभव देण्यासाठी नवं फीचर आणलं आहे. गुगलचं हे फीचर म्हणजे Google Bard हे आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगलच्या या नव्या फिचरची घोषणा गलच्या I/O या कार्यक्रमात केली आहे. त्यामुळे गुगलच्या या नव्या फिचरचा चांगला वापर आता करण्यात येणार आहे. या फिचरमध्ये बरेच बदल देखील करण्यात आले आहेत. त्यानंतर गुगलने हे फीचर लाँच केले आहे. ChatGPT नंतर गुगलला त्यांचे हे फीचर लाँच करण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. त्यांना हे फिचर कधी आणि केव्हा लाँच करावे हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु गुगलने जेव्हा त्यांच्या या निर्णयाची घोषणा केली तेव्हा त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिला नाही. 


जगभरात पसरलेले इंटरनेटचे जाळे सध्या AI च्या दिशेने जात असताचे चित्र पाहायला मिळत आहे. सोपी रिसर्च पध्दत ही काही दिवसांत AIरिसर्च पध्दतीत रुपांतरीत होईल. या गोष्टीची गुगलला चांगलीच कल्पना होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्या Google Bard या सर्च पेजला रिडीजाईन केले. याची एक झलक गुगलच्या I/O या कार्यक्रमात दाखवण्यात आली. 


कसे वापरता येईल Google Bard


 Google Bard, आता 180 हून अधिक देशांमध्ये सुरु करण्यात आला आहे.   Google च्याLLM, PaLM 2 द्वारे , Bard ने 40 अधिक भाषांचा समावेश करण्यासाठी हे फिचर आणल आहे. तसेच  Bard आता 20 हून अधिक प्रोग्रामिंग भाषांमध्ये कोडिंग आणि डीबगिंग  करू शकते. Bard सध्या चाचणी टप्प्यात आहे. त्यामुळे या फिचरची तपासणी  सुरु आहे. तसेच गुगलच्या या फिचरमुळे गुगलच्या रिसर्च पद्धतीत देखील बराच बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. Bard मध्ये मजूकरांसह चित्रावर देखील मथळा लिहिण्यास देखील आता सांगता येणार आहे. त्यामुळे गुगलचे हे फिचर नक्कीच फायदेशीर ठऱणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


PM Modi US Visit: PM मोदी अमेरिका दौरा करणार; बायडन यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा