Afganisthan Crisis Update : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडण्यासाठी धावपळ करत आहेत. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती  अमरुल्लाह सालेह यांनी तालीबान समोर झुकण्यास नकार दिला आहे. अमरुल्लाह सालेह  यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. या मुद्द्यावर अमेरिकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणे व्यर्थ असून अफगाणी नागिरकांनी आपली लढाई स्वत: लढावी लागणार आहे, असे सालेह यांनी म्हटलंय.


अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये भीती आहे. तिथले लोक इतर देशांमध्ये पलायन करु जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच अफगाणिस्तानात हजारो विदेशी लोक देखील अडकले आहेत. यात भारतासह अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, न्यूझीलंडसह अन्य काही देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत काही देशांनी आपापल्या नागरिकांना एअरलिफ्ट करुन आपल्या देशात आणलं आहे.  


रिपोर्टनुसार अद्यापही भारतातील 500 अधिकारी आणि सेक्युरिटीशी संबंधित लोक अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. यातील जवळपास 300 लोक हे डेहराडून मधील असल्याची माहिती आहे. हे सर्व माजी सैनिक आहेत जे तिथल्या यूरोपियन, ब्रिटिश एंबेसी सह अन्य ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात आहेत. नुकतंच 190 भारतीय अधिकारी आणि सुरक्षाकर्मींना काबूलमधून सुरक्षितपणे भारतात आणलं आहे. अमेरिकेनेही आपल्या लोकांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढण्यासाठी 5000 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.  


Afganisthan Crisis Update : अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती, तालिबान विरोधात युद्धाची शक्यता


काय म्हणाले सालेह


अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती  अमरुल्लाह सालेह यांनी तालीबान समोर झुकण्यास नकार दिला आहे. अमरुल्लाह सालेह  यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. या मुद्द्यावर अमेरिकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणे व्यर्थ असून अफगाणी नागिरकांनी आपली लढाई स्वत: लढावी लागणार आहे, असे सालेह यांनी म्हटलंय. सालेह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, अफगाणिस्तानच्या नियमानुसार राष्ट्रपती वारले, पळून गेले तर उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात येते. सध्या मी आपल्या देशाचा काळजीवाहू  राष्ट्रपती आहे. सध्या मी सगळ्या मंत्र्यांना त्यांच्या समर्थन आणि पाठिंब्यासाठी संपर्क करत आहे. आता अफगाणिस्तानच्या विषयावर अमेरीकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणे व्यर्थ आहे. आता अफगाणिस्तानच्या नागरिकांना ही लढाई स्वत: लढावी लागणार आहे. आता विरोध करण्यात काही उपयोग नाही. आता लढाईमध्ये सहभागी व्हा.