Temperature Increase : अमेरिकेत (America) सध्या उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अमेरिकेत काही ठिकाणाी तापमान 52.78 अंशावर म्हणजेच जवळपास 53 अंश सेल्सिअसवर गेले आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया (California) राज्यातही सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये 53 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त तापमनाची नोंद झाली आहे.
नॅशनल वेदर सर्व्हिसने अमेरिकेत उष्णतेचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस उष्णता असणार आहे. उष्णतेपासून दिलासा मिळणार नसल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 100 हून अधिक रेकॉर्ड मोडले जातील डेथ व्हॅलीचे प्रतिनिधी अॅबी वाईन्स यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरसाठी तापमान जास्त आहे. सध्या खूप गरमी होत आहे. बाष्पीभवन वेगाने होत आहे. लोकांना याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळं यावर्षी देशभरात तापमानाचे रेकॉर्ड मोडले जाण्याची शक्यता आहे.
वीजेच्या संकटाचा इशारा
निसर्गाची हानी होत असल्यानं, निसर्गाने आपला प्रकोप केला आहे. आपल्या उष्णतेच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी दिली. पृथ्वीला तीव्र पूर आणि वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे गेविन यांनी सांगितले. राज्यातील ग्रीड ऑपरेटर्संनी वीज तोडण्याचा इशारा दिल्याने लोकांच्या अडचणी वाढू शकतात. ग्रीड ऑपरेटरने संभाव्य वीज संकटाचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळं वीज खंडित होत असल्याने ई-वाहन चालकांना त्यांच्या वाहनांचे शुल्क न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याने जनतेसाठी कूलिंग सेंटरही उभारले आहेत. 2020 च्या उन्हाळ्यापासून कॅलिफोर्नियाच्या ग्रीडसाठी ही सर्वात मोठी चाचणी आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील काही भागात भीषण वीज संकट होते. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळं युरोपमधील ऊर्जा संकट वाढत असताना सध्याचे संकट आले आहे. यासह, जगभरातील हवामान बदलामुळं विक्रमी तापमानात वाढ होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: