लाहोर : पाकिस्तानातील कराचीमध्ये अजब घटना घडली. कराचीतल्या दहशतवादविरोधी कोर्टात पुरावा म्हणून सादर केलेल्या ग्रेनेडचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत.


 

कोर्टात अवैधरित्या स्फोटकं बाळगण्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी ग्रेनेडचा वापर कसा होतो, अशी विचारण न्यायाधीशानं एका पोलीस कॉन्स्टेबलला केली. त्यावर तोंडी उत्तर देण्याऐवजी या कॉन्स्टेबलनं चक्क ग्रेनेड कसा वापरतात हे प्रात्यक्षिक करुन दाखवलं.

 

त्यानं ग्रेनेडची पिन ओढताच त्याचा स्फोट झाला आणि त्यात त्याच्यासह, न्यायाधीश आणि अन्य दोघे जखमी झाले. त्यानंतर कोर्टाचं काम स्थगित करण्यात आलं आणि जखमींना उपचारासठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान उपचारानंतर संबंधित कॉन्स्टेबलविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.