लंडनसह इंग्लंडमधील कमीत कमी 10 शहरांमध्ये ट्रम्प यांच्या या नव्या धोरणाविरोधात निदर्शनं केली जाऊ शकतात, असा अंदाज लावला जात आहे.
दरम्यान इंग्लंडच्या ज्या नागरिकांकडे बंदी घालण्यात आलेल्या देशाचंही नागरिकत्व आहे, त्यांना अमेरिकेत प्रवेश करता येईल, असं इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सात देशातील मुस्लीमांना अमेरिकेत नो एंट्री
सीरियासह सात देशातील नागरिकांना पुढील 90 दिवस अमेरिकेत कोणत्याही कामासाठी जाता येणार नाही. तर निर्वासितांना चार महिन्यांची तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशांचा यामध्ये समावेश आहे.
अमेरिकेतील दहशतवाद संपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेवर प्रेम करतील आणि देशाच्या हिताचा विचार करतील, त्यांनाच अमेरिकेत जागा दिली जाईल, असं ट्रम्प यांनी पेंटागन येथे सांगितलं होतं.
संबंधित बातम्या :