Nigeria Church Attack: नायजेरियात एका कॅथलिक चर्चमध्ये (Catholic Church) गोळीबार झाल्याची बातमी समोर येत आहे. या गोळीबारमध्ये 50 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना सशस्त्र लोक ओंडो शहरातील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये घुसले आणि त्यांनी गोळीबार केला.
लोकप्रतिनिधी (Public Representative) ओगुनमोलासुयी ओलुवोले यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी ओंडो राज्यातील सेंट फ्रान्सिसच्या कॅथलिक चर्चला लक्ष्य केले. 'पेंटेकॉस्ट संडे' या ख्रिश्चन सणानिमित्त तेथे भाविक जमल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. मृतांमध्ये अनेक मुलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ते घटनास्थळी आणि रुग्णालयातही गेले, जिथे जखमींवर उपचार सुरू आहेत. ओलुवोले म्हणाले की, "ओवोच्या इतिहासात अशी घटना आम्ही कधीच अनुभवली नाही." नायजेरियाच्या लोअर लेजिस्लेटिव्ह चेंबरमधील ओंडो प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे अडेलेग्बे तिमिलीन म्हणाले की, पुजारी यांचेही अपहरण करण्यात आले.
50 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
एपी वृत्तसंस्थेनुसार, अधिकार्यांनी तात्काळ (Nigerian security forces) अधिकृत मृतांची संख्या जाहीर केली नाही. परंतु टिमलेन यांनी सांगितले की, किमान 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी 50 हुन अधिक लोकांचा मृत्यू झालं असल्याचं सांगितलं आहे. हा हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, नायजेरियाच्या बऱ्याचशा भागात सुरक्षेसंबंधी समस्या आहेत. ओंडो हे नायजेरियातील (Nigeria) सर्वात शांत राज्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. मात्र येथे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये सतत हिंसक संघर्ष होत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या:
- चीन बनवत आहे स्वतःचे स्पेस स्टेशन, तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवलं
- पाकिस्तानमध्ये मोठे वीज संकट: आपत्कालीन योजना तयार करा, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सूचना
- Bangladesh Fire in Container Depot : बांग्लादेशच्या कंटेनर डेपोला भीषण आग; 35 जणांचा मृत्यू तर 450 हून अधिक जखमी
- NASA Released Stunning Video of Jupiter : NASA च्या 'जुनो'कडून सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह 'गुरु' कॅमेऱ्यात कैद; व्हिडीओ व्हायरल