ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये शुक्रवारी (15 मार्च) झालेल्या हल्ल्यात 7 भारतीय/भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट झालं आहे. तर दोन भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. या हल्ल्यात 49 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 40 हून अधिक नागरिक जखमी आहेत.


हैदराबादचे रहिवाशी फरहाज हसन, इम्रान अहमद खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुजरातच्या नवसारी येथील जुरैद युसूफ कारा आणि भरुचचे मुसावली सुलेमान पटेल या तरुणाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तसेच दोन भारतीय अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.


भारतीय नागरिकांच्या शोधासाठी आम्ही न्यूझीलंडमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं भारतीय उच्चायुक्ताने स्पष्ट केलं आहे. जखमी असलेल्या दोन भारतीयांवर उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्याही संपर्कात असल्याचं भारतीय उच्चायुक्ताने स्पष्ट केलं आहे.


दोन पाकिस्तानी नागरिकांचाही मृत्यू


दोन मशिदींवर झालेल्या या हल्ल्यात दोन पाकिस्तानी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. हल्लेखोरासोबत झालेल्या झटापटीत नईम रशीद जखमी झाले होते.  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.


हल्लेखोर अटकेत


49 नागरिकांचा जीव घेणारा मुख्य हल्लेखोर बेंटन हॅरिसन टॅरेंटसह चार हल्लेखोरांना पोलिसांनी काल अटक केली होती, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या चारही हल्लेखोरांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने सर्वांची कारागृहात रवानगी केली आहे. हॅरिसन टॅरेंटने हल्ल्याचा लाईव्ह व्हिडीओही बनवला होता.


अलनूर आणि निनवूड या मशिदींवर हल्ला


न्यूझीलंडमधील अलनूर आणि निनवूड या दोन मशिदींमध्ये चार हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. पाश्चिमात्य देशातील सर्वात मोठा मुस्लीमविरोधी हल्ला असल्याचं बोललं जात आहे.


संबधित बातम्या


न्यूझीलंडमधील दोन मशिदीतील अंदाधुंद गोळीबारात 49 जणांचा मृत्यू, 9 भारतीय नागरिक बेपत्ता