पॅरीस: फ्रान्सच्या डेटा प्रायव्हसी वर नजर ठेवणाऱ्या सीएनआयएल या संस्थेनं गुगल आणि अॅमेझॉनला डेटा प्रायव्हसी नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी तब्बल 16.3 कोटी डॉलर्सचा दंड केला आहे. यामध्ये गुगलला 12.1 कोटी डॉलर्स तर अॅमेझॉनला 3.5 कोटी डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे.


नॅशनल कमिशन ऑन इंफोर्मॅटिक्स अॅन्ड लिबर्टी (सीएनआयएल) ने त्यांच्या एका निवेदनात सांगितलंय की या दोन्ही कंपन्यांनी जाहिरात कुकीज नियमांचं उल्लंघन केलं आहे. या कंपन्यांनी जाहिराती उद्देशांसाठी कुकीज वाचण्याची पूर्वपरवानगी घेतली नाही. या कुकीज आणि ट्रॅकर्स व्यक्तीच्या संगणकात तशाच राहतात.


गुगल आणि अॅमेझॉनने आपल्या युजर्सना हे सांगितले नाही की जाहिरातींसाठी ते या कुकीजचा वापर करणार आहेत. कारण या गोष्टींसाठी युजर्स त्यांना नकार देऊ शकतात. या कंपन्यानी सप्टेंबरमध्ये त्यांच्या वेबसाईटमध्ये काही बदल केले होते. पण फ्रान्सच्या नियमांनुसार ते अपुरे होते.


5 कोटी युजर्सवर प्रभाव
सीएनआयएलच्या मते गुगलने कुकीजचा वापर करुन जाहिराती केल्या आणि त्यापासून उत्पन्न कमावलं. गुगलच्या या गोष्टीचा प्रभाव सुमारे 5 कोटी युजर्सवर पडला. यामध्ये बदल करण्यासाठी सीएनआयएलने या दोन्ही कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. या कालावधीत कंपन्यांना त्यांच्या युजर्सना सांगणे आवश्यक होते की त्यांनी कुकीजचा कशा पध्दतीनं वापर केला आणि युजर्स त्याला कशा प्रकारे नकार देऊ शकतात. तीन महिन्यात असं जर केलं गेलं नाही तर प्रत्येक दिवशी दहा हजार यूरोंचा दंड लावला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं होतं.


महत्वाच्या बातम्या: